Coronavirus Cases Today, Coronavirus Latest Marathi News
Coronavirus Cases Today, Coronavirus Latest Marathi News Saam Tv
देश विदेश

देशात कोरोना रुग्णसंख्येत घट, गेल्या २४ तासात २५६८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, २० मृत्यू

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: देशात सध्या कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसून येत आहे. गेल्या २४ तासात अडीच हजारांहून अधिक कोरोना (corona ) रुग्ण आढळले आहेत. दिलासा देणारा हा आकडा कालच्या तुलनेत १८.७ टक्के कमी आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ तासांत २५६८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर कोविडमुळे (Covid) आणखी २० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या देशात कोरोनाचे (corona) एकूण सक्रिय रुग्ण १०,१३७ आहेत. (Coronavirus Cases Today)

हे देखील पाहा-

देशात कोरोना संसर्गाचा दैनंदिन दर ०.०४ टक्क्यांवर पोहोचला आहे. दिवसभरात देशात २ लाख ९५ हजार ५८८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. देशव्यापी कोरोना लसीकरणात आतापर्यंत १८९ कोटीपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधात्मक लसी (Vaccination) देण्यात आल्या आहेत. रविवारी दिवसभरात ४ लाख २ हजार १७० कोरोना रुग्णांना लसी देण्यात आल्या आहेत. देशात आतापर्यंत १८९ कोटी २३ लाख ९८ हजार ३४७ कोरोना लसी देण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे देशात आतापर्यंत एकूण ५ लाख २३ हजार ८४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण १ लाख ४७ हजार ८४३ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासह केरळमध्ये ६९ हजार ४७, कर्नाटकमध्ये ४० हजार १०१, तामिळनाडूमध्ये ३८ हजार २५, दिल्लीमध्ये २६ हजार १७५, उत्तर प्रदेशमध्ये २३ हजार ५०७ आणि पश्चिम बंगालमध्ये २१ हजार २०१ लोकांचा कोरोना विषाणुमुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांपैकी ७० टक्क्यापेक्षा जास्त रुग्ण इतर आजारांनी ग्रस्त झाले होते.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

SCROLL FOR NEXT