Uttar Pradesh Crime  SAAM TV
देश विदेश

Uttar Pradesh Crime : हॉटेलमध्ये जबरदस्ती दारू पाजली; सामूहिक बलात्कारानंतर हॉटेलबाहेर फरफटत नेले, मित्रासह ५ जणांचे भयंकर कृत्य

Agra Crime News : आगरा येथील हॉटेलमध्ये कर्मचारी महिलेवर मित्रासह चौघांनी सामूहिक अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यात एका महिलेचाही समावेश आहे.

Saam TV News

Agra crime news :

उत्तर प्रदेशातील आगरा येथे एका हॉटेलमध्ये कर्मचारी महिलेवर तिच्या मित्रासह चार जणांनी सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी पीडितेला बेदम मारहाणही केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली.

आगरा येथील हॉटेलमध्ये कर्मचारी महिलेवर चार जणांनी सामूहिक अत्याचार केला. घटनास्थळावरील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नराधमांसमोर ती गयावया करत होती. आरोपींना प्रतिकार केल्यानंतर त्यांनी तिला बेदम मारहाणही केली. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत आरोपींना एका महिलेनेही मदत केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महिलेने स्वतःचा बचाव करण्यासाठी आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिला पाच जणांनी जबरदस्ती खोलीत कोंडले. त्यांनी बेदम मारहाण केली.

रिपोर्टनुसार, हॉटेलमध्ये पाच जणांनी पीडितेला जबरदस्ती दारू पाजली. तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. पीडितेचा आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढला. त्यानंतर तिला ब्लॅकमेल केले. आरोपींनी तिच्या डोक्यात काचेची बाटली फोडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे हॉटेल ताजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. पीडित महिला दीड वर्षापासून या हॉटेलमध्ये नोकरी करत आहे. तिचा मित्र चार मित्रांना सोबत घेऊन या हॉटेलमध्ये पोहोचला. तिला जबरदस्ती दारू पाजली.

घटनास्थळावरील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पीडित महिला जमिनीवर पडल्याचे त्यात दिसत आहे. तिच्या बाजूला आरोपी उभा असून, त्याच्यासमोर ती गयावया करत आहे. काही जण तिला पकडून बाहेर फरफटत नेत आहेत. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये एका तरूणाने तिला पकडले आहे. पीडिता त्यांना हात जोडून विनवण्या करत आहे. पण आरोपी तरूण तिला फरफटत घेऊन जात होता.

पोलीस अधिकारी अर्चना सिंह यांनी सांगितले की, ताजगंज पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. बसई चौक परिसरातील एका हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार आणि तिला मारहाण झाली आहे, असे सांगण्यात आले. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पाचही आरोपींना तात्काळ अटक केली आहे. त्यात एक महिला देखील आहे. पीडितेची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT