Tamilnadu Women Died saam tv
देश विदेश

Shocking: लग्नानंतर देवदर्शनाला गेले असता नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू ; माकडांना पाहून घाबरली, पळत असताना दरीत पडली

Tamilnadu Women Died: तामिळनाडूमध्ये एका महिलेचा देवदर्शनासाठी गेले असता मृत्यू झाला. ही महिला उंच डोंगरावरून दरीत पडली

Priya More
  • तामिळनाडूमध्ये २४ वर्षीय नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

  • मंदिराजवळ माकडांना फळे खाऊ घालताना घडली घटना

  • माकडांना घाबरून पळत असताना तोल जाऊन ती दरीत पडली

  • पोलिस आणि बचाव पथकाने मृतदेह बाहेर काढून तपास सुरू केला

तामिळनाडूमध्ये २४ वर्षीय नवविवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. डोंगरावरून दरीत पडून या महिलेचा मृत्यू झाला. तामिळनाडूच्या तुतीकुडी जिल्ह्यामध्ये शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. ही महिला देवदर्शनासाठी मंदिरात गेली होती. ती डोंगराजवळ माकडांना फळे खायला घालत होती. त्याचवेळी माकडांच्या कळपाने तिला घेरलं. त्यामुळे ती प्रचंड घाबरली आणि पळत असताना ती पाय घसरून दरीत पडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, तुतीकुडी जिल्ह्यातील कोविलपट्टीतील दक्षिण थिट्टनकुलम भागामध्ये ही महिला राहत होती. अनिता असे या महिलेचे नाव होते. मागच्या महिन्यामध्ये तिचे २९ वर्षीय सुरेशसोबत लग्न झाले होते. सुरेश विदेशामध्ये काम करत होता. नुकताच तो घरी परत आला होता. दोघेही देवदर्शनासाठी कजुगुमलाई येथील कलुगासलमूर्ति मंदिरात गेले होते. त्यावेळी ही भयंकर घटना घडली आणि लग्नाच्या एका महिन्यामध्येच अनिताचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मुख्य मंदिरात पूजा केल्यानंतर अनिता आणि तिचा नवरा सुरेश टेकडीवरील उचिप्पिल्लैयार मंदिरात गेले. पोलिसांनी सांगितले की, ते माकडांना फळे खाऊ घालत असताना अचानक तिथे अनेक माकडं त्यांच्याभोवती जमा झाली. त्यावेळी अनिता माकडांना पाहून घाबरली. ती त्याठिकाणावरून पळून जात असताना अचानक तिचा तोल गेला आणि टेकडीवरून ती खाली पडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अनिताचा मृत्यू झाला. अनिताच्या मृत्यूनंतर तिच्या नवऱ्याला मोठा धक्का बसला. घटनास्थळावर तो जोरजोरात रडत होता.

कझुगुमलाई अग्निशमन आणि बचाव पथकाने आणि पोलिसांनी अनिताचा मृतदेह दरीतून बाहेर काढत ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास करत आहेत. माकडांना घाबरून अनिता टेकडीवरून खाली पडली तरी देखील आम्ही योग्य पद्धतीने या घटनेचा तपास करत आहोत, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हरामखोर गेले पण शिवसैनिक हलला नाही - उद्धव ठाकरे

मुंबईत ३०००० लोकांचा जीव होता धोक्यात? मोहरम मिरवणुकीतला 'विषारी' कट उधळला, १४,९०० कॅप्सूल जप्त

Mumbai Water Update : मुंबईकरांची चिंता वाढली! पाऊस लांबला, धरणांनी तळ गाठला; सातही धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा शिल्लक?

July 1 Rule Change : १ जुलैपासून देशात 5 मोठे बदल; LPG, ATM ते HDFC कार्डधारकांवर होणार थेट परिणाम

केतन अगरवाल हत्या प्रकरणात थेट क्रिकेट कनेक्शन समोर; पोलिसांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT