Bread Saam Tv
देश विदेश

Tamilnadu News: घशात ब्रेड अडकल्याने 21 वर्षीय बॉडी बिल्डरचा मृत्यू; चॅम्पियन होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं

एम हरिहरन असे या बॉडी बिल्डर तरुणाचे नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

Tamilnadu News : घशात ब्रेड अडकल्याने एका बॉडी बिल्डर तरुणाचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना तामिळनाडूच्या कड्डालोरमध्ये समोर आली आहे. वर्कआऊट करताना या तरुणाने नाश्त्यात ब्रेड खाल्ला होता. मात्र ब्रेडचा तुकडा त्याच्या घशात अडकल्याची माहिती समोर येत आहे.

एम हरिहरन असे या बॉडी बिल्डर तरुणाचे नाव आहे. सेलम जिल्ह्यातील पेरिया कोलापट्टीचा तो रहिवासी होता. हरिहरन राज्यस्तरीय बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार होता आणि त्यासाठीच तयारी करत होता.

बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपसाठी राज्यातील विविध ठिकाणांहून स्पर्धक कुड्डालोरमध्ये आले होते. एका मंडपात सर्व स्पर्धकांची सोय करण्यात आली होती. रविवारी रात्री हरिहरन व्यायाम करत होता. वर्कआऊटनंतर त्याने ब्रेड खाल्ला. (Latest News)

यावेळी ब्रेडचा एक मोठा तुकडा त्यांच्या घशात अडकला. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हरिहरनच्या मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हरिहरन 70 किलो गटात स्पर्धेत सहभागी होणार होता. मात्र स्पर्धेआधीच या दुर्दैवी घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT