Rahul Gandhi and PM narendra Modi saam tv
देश विदेश

भाजपाची खरी परीक्षा २०२६ मध्येच! ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक, सध्या कुणाचे आहे सरकार?

2026 Assembly Elections states list : २०२६ मध्ये देशातील ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून भाजपसाठी हे वर्ष निर्णायक ठरणार आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीतील सध्याची सत्ता आणि राजकीय समीकरणांचा आढावा.

Namdeo Kumbhar

2026 Assembly Elections Update : पुढील काही महिन्यात देशात ५ राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे २०२६ हे वर्ष राजकारण्यांसाठी महत्त्वाचे वर्षे असेल, विशेष करून भाजपसाठी. कारण निवडणुका विधानसभेच्या असल्या तरी त्याचा प्रभाव राष्ट्रीय राजकारणावर होणार आहे. आसाम, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळ या ५ राज्यात यंदा विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. एकीकडे भाजपकडून या ५ राज्यात सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, तर दुसरीकडे विरोधी पक्ष (काँग्रेस आणि प्रादेशिक) भाजपला हरवण्यासाठी एकजूट होऊ शकतो.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसमोर कडवे आव्हान -

मार्च-एप्रिलमध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या ममता बॅनर्जी यांचं सरकार आहे. २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी २१३ जागेवर विजय मिळवत ४८ टक्के मते मिळवली होती. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे. पण आर्थिक आव्हाने आणि प्रशासनातील वादाचा सरकारवर परिणाम पडल्याचे दिसतेय. २०२१ मध्ये भाजपने पश्चिम बंगालमध्ये ७७ जागांवर विजय मिळवला होता. बिहार विधानसभेत भाजपला भरघोस यश मिळाले, त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ते अधिक आक्रमकपणे उतरणार आहे. बंगालमध्ये काँग्रेस कमकुवत झालेले आहे. त्यांच्याकडे तगडे स्थानिक नेतृत्व नाही. बंगालमध्ये भाजपने भरघोस यश मिळवले तर काँग्रेसच्या राजकीय भवितव्य आणखी धोक्यात येऊ शकते.

आसाममध्ये भाजपची मजबूत पकड -

आसाममध्ये सध्या हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे. २०२१ च्या निवडणुकीत भाजप युतीने ७५ जागा जिंकत सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवली होती. मागील काही वर्षांत आसाममध्ये सरमा यांनी एक फायरब्रँड नेता म्हणून नाव स्थापन केलेय. विरोधी पक्षात गौरव गोगोई यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस लढण्यासाठी सज्ज आहे. मुस्लिम मतांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेले एआययूडीएफसारखे पक्ष देखील आगामी विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावतील. या निवडणुका भाजपसाठी ईशान्येकडील राज्यात आपली पकड मजबूत करण्याची संधी आहे. तर काँग्रेसची आसाममध्ये सत्ता मिळवण्यासाठी ताकद पणाला लावेल. मार्च-एप्रिल महिन्यात आसामच्या निवडणुका होऊ शकतात.

तामिळनाडूमध्ये एम.के. स्टॅलिनचे वर्चस्व -

तामिळनाडूमध्ये सध्या एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) यांचं सरकार आहे. २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्टॅलिन यांनी २३४ पैकी १३३ जागा जिंकल्या. आता मार्च महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी ते सज्ज झाले आहे. त्यांना यावेळी AIADMK-BJP युतीचा सामना करावा लागणार आहे. त्याशिवाय अभिनेता विजय याचा TVK याचाही प्रभाव यंदाच्या निवडणुकीत दिसू शकतो. स्टॅलिन यांनी तामिळनाडूमध्ये अनेक योजना राबवल्या आहेत, त्याचा फायदा सर्वसामान्यांना झाल्याचा दावा केला जातोय. पण बेरोजदारीच्या मुद्द्यावर विरोधकांकडून टार्गेट केले जाऊ शकते.

केरळमध्ये काँग्रेसचे सरकार येणार का?

केरळमध्ये सध्या पिनारायी विजयन यांच्या डाव्या लोकशाही आघाडीचे (एलडीएफ) सरकार आहे. २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयन यांच्या आघाडीने ९९ जागा जिंकल्या होत्या. विजयन पुन्हा सत्ते येण्यासाठी तयारी करत आहे. २०२५ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस-यूडीएफने चांगली कामगिरी केली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून विजयन यांना कडवे आ्हान मिळू शकते. त्याशिवाय केरळमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडूनही प्रयत्न केले जात आहे.

पुद्दुचेरीमध्ये एनडीए कमबॅक करणार का?

ऑल इंडिया एनआर काँग्रेस (एआयएनआरसी) आणि भाजप यांचं सरकार सध्या पुद्दुचेरीमध्ये आहे. एन. रंगासामी यांच्या नेतृत्वाखाली २०२१ मध्ये १६ जागांवर विजय मिळवत सत्ता मिळवली होती. ३० जागांच्या विधानसभेत एआयएनआरसीने १० आणि भाजपने ६ जागा जिंकल्या होत्या. पण सध्याच्या परिस्थितीत भाजप आणि एआयएनआरसी यांच्यातील युती तुटण्याची शक्यता आहे. त्यातच काँग्रेसकडून पुद्दुचेरीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी ताकद पणाला लावली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Tips: अजूनही नीट मेकअप करता येत नाही? मग रोज मेकअपसारख्या ग्लोसाठी लावा 'या' तीन गोष्टी

मुंबई हादरली! पिस्तुल काढलं अन् स्वत:वर धाड धाड गोळ्या झाडल्या, कांदिवलीत ४५ वर्षीय व्यक्तीचा टोकाचा निर्णय

TATA Sierra चं सर्वात स्वस्त मॉडेल कोणतं आहे?

Maharashtra Live News Update:आमदार सुरेश धस यांच्यावरील टीकेचा निषेध; आष्टीत सोशल फोरमचा 'टोणगा मोर्चा'

Buldhana Accident: नांदुरा- बुऱ्हाणपूर मार्गावर भीषण अपघात,भरधाव वडाप टॅक्सी खड्ड्यात उलटली

SCROLL FOR NEXT