Tamilnadu News: तमिळनाडूच्या मधुराईमध्ये (Madurai) धक्कादायक घटना घडली आहे. २० वर्षीय कॉलेजच्या विद्यार्थ्याचा कार्डिअॅक अरेस्टमुळे (Cardiac Arrest) मृत्यू झाला आहे. मॅरेथॉनमध्ये धावल्यानंतर दोन तासांनंतर या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. मधुराईमध्ये रविवारी रक्तदान जगजागृतीनिमित्त मॅरेथॉनचे (Marathon) आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हा विद्यार्थी सहभागी झाला होता. एम दिनेशकुमार असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मदुराई मेडिकल कॉलेजने (Madurai Medical College) रविवारी 'उथीराम २०२३' रक्तदान जनजागृतीसाठी मॅरेथॉनचे आयोजन केले होते. या मॅरेथॉनमध्ये कल्लाकुरिची जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या एम दिनेशकुमार या २० वर्षीय विद्यार्थ्याने सहभाग घेतला होता. एम दिनेशकुमार हा बीई मॅकेनिकल इंजिनिअरिंगचा शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी होता. आपल्या मित्रांसोबत तो या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाला होता. या मॅरेथॉनमध्ये जवळपास 4,500 महिला आणि पुरुषांनी सहभाग घेतला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूचे आरोग्य मंत्री सुब्रमण्यम यांनी सकाळी सहा वाजता मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. या मॅरेथॉनमध्ये एम. दिनेशकुमार हा विद्यार्थी १० किलोमीटरपर्यंत धावला. मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर दिनेशकुमार रेस्ट रुममध्ये गेला. एक तासानंतर दिनेशकुमार अचानक आजारी पडला. मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या इतर विद्यार्थ्यांना दिनेशकुमारची तब्येत खराब झाल्याची माहिती डॉक्टरांना दिली.
त्यानंतर डॉक्टरांनी दिनेशकुमारला राजाजी गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल केले. त्याला लाइफ सेव्हिंग ट्रीटमेंट देण्यात आली. पण त्याचे ब्लड प्रेशर आणि पल्स कमी होत गेले. राजाजी हॉस्पिटलचे डीन डॉ. ए. रथिनावेल यांनी सांगितले की, 'दिनेशकुमार यांना अचानक कार्डियक अरेस्ट आला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. दिनेशकुमारला सकाळी ८.४५ वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि सकाळी १०.४५ वाजता मृत घोषित करण्यात आले.' दरम्यान, दिनेशकुमारच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.