uttar pradesh news  Saam tv
देश विदेश

चुलीवर स्वयंपाक करताना आईला मिठी मारली; उकळते दूध अंगावर पडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Uttar pradesh shocking : चुलीवर गरम करायला ठेवलेले दूध दोन वर्षांच्या मुलावर पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने प्रसाद कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Vishal Gangurde

उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात घडली दुर्दैवी घटना

उकळते दूध अंगावर पडल्याने दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू

आईला मिठी मारताना घडला अनर्थ

उत्तर प्रदेशच्या कौशाम्बी जिल्ह्यातील सरायअकिल भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने हसत्या-खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चुलीवरील उकळते दूध उतरवताना अनर्थ घडून दोन वर्षांचा मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अंगावर उकळते दूध पडल्यानंतर मुलाला रुग्णालयात नेताना रस्त्यात मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशच्या बिगहारा गावात ही दुर्दैवी घटना घडली. या गावातील मंगल प्रसाद हे कुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी मजुरीचे काम करतात. मंगल प्रसाद हे सोमवारी रात्री बाजूच्या गावात तीन मुलांना घेऊन कार्यक्रमाला गेले होते. घरात त्यांची पत्नी सावित्री देवी आणि दोन वर्षांचा मुलगा मनु होता.

सवित्री देवीने रात्री ९ वाजण्याच्या सुमारास चुलीवर दूध गरम करायला ठेवलं. पातेल्यातील दूध गरम झाल्यानंतर उतरवायला गेली. त्यावेळी मनुने धावत धावत येत आईला मिठी मारली. त्यावेळी आईचा तोल ढासळला. त्यानंतर पातेल्यातील उकळते दूध थेट मनुच्या अंगावर पडलं.

उकळते दूध अंगावर पडल्याने मनु भाजला. मनुच्या अंगावर दूध पडल्यानंतर आईने आरडाओरड करत शेजाऱ्यांना बोलावून घेतलं. शेजाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले, परंतु वाटेतच मनुचा मृत्यू झाला.

मंगल प्रसाद यांच्या नातेवाईकांनी मनुचे पोस्टमार्टम न करता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस अधिकारी वीर प्रताप सिंह यांनी सांगितलं की, 'आम्हाला माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलो. आम्हाला कुटुंबाने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. मनुच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. आई सवित्री रडून रडून बेहाल झाली आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anushka Sharma : RCB च्या विजयानंतर अनुष्काची खास पोस्ट; विराटसोबत बेभान होऊन नाचली, मिसेस कोहलींचा आनंद गगनात मावेना | VIDEO

MLC Election : पुण्यात मोठा ट्वीस्ट! भाजप नेत्याला राष्ट्रवादीतून उमेदवारी, ३ तास आधी हातात घड्याळ घेतलं अन्...

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

Political News : पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळात मोठा विस्तार, ३५ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

HSRP Number Plate Update: ... तर तुम्हाला भरावा लागणार ₹१००० चा दंड, HSRP नंबर प्लेटवर मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT