Hyderabad Hit And Run Case: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये (Hyderabad) एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तीन महिलांना भरधाव कारने (Hyderabad Car Accident) चिरडले. या घटनेमध्ये दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताचा तपास हैदराबाद पोलिसांकडून (Hyderabad Police) सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये मंगळवारी सकाळी ही घटना घडली. मॉर्निंग वॉकसाठी दोन महिला आणि एक मुलगी गेल्या होत्या. रस्त्याच्या कडेवरून जात असताना अचानक एक भरधाव कार आली आणि तिने या तिघींना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये तिघीही अक्षरश: कारसोबत रस्त्याच्या कडेला फेकल्या गेल्या. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या मुलीवर रुणालयात उपचार सुरु आहे. तिची प्रकृती गंभीर आहे.
हैदराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद शहरातील हैदरशाकोट मेन रोडवर सकाळी 6.10 च्या सुमारास हा अपघात झाला. या तिन्ही महिला नेमक्या कोण आहेत. त्यांचा एकमेकिंशी काय संबंध आहे याची माहिती अद्याप समोर आली नाही. या अपघात प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा नरसानिगी पोलिसांकडून तपास सुरु आहे.
या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वळणाचा रस्ता आहे. रस्त्याच्या कडेला तिन्ही महिला चालत आहेत. या महिलांच्या पाठीमागून लाल रंगाची कार येताना दिसत आहे. महिलांना पाहून चालकाने ब्रेक दाबला. मात्र कारचा वेग इतका जास्त होता की चालकाला त्यावर नियंत्रण ठेवता आले नाही. ही कार थेट तिन्ही महिलांना धडक देतो. कारसोबत या तिन्ही महिला थेट झाडाझुडपात जाऊन पडतात. सोसायटीच्या गेटवर लावलेल्या कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.