Court  Saam Tv
देश विदेश

Corruption: भ्रष्टाचार प्रकरणात चीनच्या माजी मंत्र्यांसह दोघांना मृत्युदंडाची शिक्षा

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेंतर्गत माजी मंत्र्यांसह दोन चिनी अधिकाऱ्यांना दोन वर्षांच्या शिक्षेसह मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.

वृत्तसंस्था

बीजिंग : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेंतर्गत माजी मंत्र्यांसह दोन चिनी अधिकाऱ्यांना दोन वर्षांच्या शिक्षेसह मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. माजी न्यायमंत्री आणि चीनचे सर्वात शक्तिशाली पोलीस प्रमुखांपैकी एक असलेल्या फू झेंगहुआ यांना गुरुवारी उत्तर-पूर्व चीनच्या(China) जिलिन प्रांतात इंटरमिडिएट पीपुल्स कोर्ट ऑफ चांगचुनने १७.३ मिलियन अमेरिकी डॉलरच्या भ्रष्टाचार (Corruption) आणि सत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.

वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, फू झेंगहुआ यांना शिक्षा सुनावल्यानंतर काही तासांतच याच कोर्टाने जिआंगसूचे माजी अधिकारी वांग लाइक यांनाही मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. अधिकृत माध्यमांच्या माहितीनुसार, त्यांना लाच स्वीकारणे, गुन्हेगारी गटांशी संगनमत आणि बनावट ओळखपत्र तयार करणे याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.

चिनी मीडियाच्या एका रिपोर्टनुसार, वांग जिआंगसू प्रांतीय समिती कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीपीसी)चे माजी सदस्य आणि सीपीसी जिआंगसू प्रांतीय समितीच्या राजकीय आणि विधी समितीचे माजी सचिव आहेत.

तत्पूर्वी, बुधवारीच भ्रष्टाचार प्रकरणात तीन पूर्व भागातील पोलीस प्रमुखांनाही तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. त्यांच्यावर हाँगकाँगस्थित साउथ चायना मॉर्निंगच्या माजी सार्वजनिक सुरक्षा उप मंत्री सन लिजुनच्या नेतृत्वाखालील राजकीय गटाचा भाग असल्याचा आरोप होता.

सन २०१२ मध्ये सत्तेत आल्यानंतर ६९ वर्षीय शी जिनपिंग यांनी भ्रष्टाचारविरोधी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत कारवाई तीव्र होत असल्यानं भ्रष्टाचार करणाऱ्यांनी धसकाच घेतला आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांसह दहा लाखांहून अधिक अधिकाऱ्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

शी जिनपिंग या वर्षीच्या अखेरीस अध्यक्षपदाचा दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहेत. अध्यक्षपदाच्या तिसऱ्या कार्यकाळासाठीही त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अध्यक्षपदासाठी त्यांना पाठिंबा मिळाल्यास सीपीसीचे संस्थापक माओत्से तुंग यांच्यानंतर दोन कार्यकाळापेक्षा अधिक काळ सत्तेत राहणारे सीपीसीचे पहिले नेते ठरतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'ना मोहोळांवर - ना भाजपवर माझा राग, पण...'; केंद्रीय मंत्र्यांविरोधात रान उठवणारे रवींद्र धंगेकर नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Live News Update: शिर्डीत बोगस मतदारांचा आकडा 15 हजारांपर्यंत जाईल - बाळासाहेब थोरात

तुमच्या घरातील किचनसाठी कोणता रंग लकी आहे?

Bhau Beej 2025: संध्याकाळी भाऊबीज करावी की नाही? आजच्या दिवसाचे शुभ मुहूर्त काय

Kolhapur: मध्यरात्री ८ ते १० तरुण गावभर फिरले, नंतर रस्त्याच्या मधोमध केली अघोरी पूजा; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT