नवी दिल्ली: देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच कोरोनच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 2,82,970 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, गेल्या 24 तासात 441 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, या कालावधीत 1,88,157 जण संसर्गातून बरे झाले आहेत. तर, नवीन प्रकरणांनंतर सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 18,31,000 झाली आहे. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 15.13 टक्के इतका झाला आहे. (India Corona Latest News Update)
सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात
राज्यात गेल्या 24 तासात 39,207 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 72,82,128 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. तसेच 38,824 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 68,68,816 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या 24 तासात 53 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1,41,885 रुग्णांना कोरोनामुळे आपला जिव गमवावा लागला आहे. सध्या राज्यात 2,67,659 रुग्ण अॅक्टीव आहेत.
ओमिक्रॉन संसर्गाची परिस्थिती
देशात कोव्हिड-19 च्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराने संक्रमित लोकांची संख्या देखील वेगाने पसरत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, या व्हेरिएंटच्या 8,961 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात राज्यात एकही ओमिक्रॉन बाधित रुग्णाची नोंद झालेली नाही. राज्यात आतापर्यंत 1860 ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत 1,001 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.