2 June Ki Roti Saam TV
देश विदेश

2 June Ki Roti: फार नशीबवान लोकांनाच मिळते २ जूनची चपाती; कारण जाणून व्हाल थक्क

Roti News: ज्यांचं नशीब चांगल आहे त्यांनाच २ जूनची चपाती खयला मिळते, असं एक युजरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंचवर लिहिलं आहे.

Ruchika Jadhav

2 June Ki Roti Viral: आज २ जून आणि आजच्या दिवशी सोशल मीडियावर एक मॅसेज जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये मोठं नशीब असलेल्यांनाच २ जूनची चपाती मिळते असा मॅसेज व्हायरल होताना दिसतो आहे. खरंतर ही एक हिंदी भाषेतील म्हण आहे. या म्हणीचा अर्थ नेमका काय हे जाणून घेऊ. (Latest Marathi News)

ज्यांचं नशीब चांगल आहे त्यांनाच २ जूनची चपाती खयला मिळते, असं एक युजरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंचवर लिहिलं आहे. तर आणखीन एकाने म्हटलंय की, फार मेहनतीने मिळतेय २ जूनची चपाती. प्रत्येक व्यक्ती आपल्या आहारात चपातीचा समावेश करतो. ही चपाती लोकं दररोज खातात. मात्र तरी देखील फक्त २ जूनची चपाती इतकी खास का आहे? असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल.

'2 जून की रोटी' काय आहे अर्थ?

खरंजर २ जूनची चपाती ही एक म्हण आहे. याचा अर्थ असा होतो की, प्रत्येक व्यक्तीच्या नशीबात दोन वेळचे जेवन नसते. फार नशीबवाम व्यक्तींना दोन वेळचे जेवण मिळते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या अन्नाचा, जेवणाचा (Food) आदर केला पाहिजे. ताटात वाढलेलं सर्व जेवण संपवलं पाहिजे.

दोन जून ची चपाती (Chapati) याचा अर्थ तारखेनुसार नाही तर वेळेनुसार जोडला जातो. इथे २ जूनची चपाती म्हणजे २ वेळचे जेवण असा अर्थ आहे. त्यामुळे अनेक आई बाबा आपल्या मुलांना जेवणाचे महत्व समजवून सांगण्याचा प्रयत्न करतात. यावेळी हिंदीतील "सबको नसीब नही होती २ जून की रोटी' या म्हणीचा वापर केला जातो.

भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. मात्र तरी देखील आपल्या देशात आजही अनेक व्यक्तींना दोन वेळच्या जेवणासाठी मोठी धडपड करावी लागते. शेती आणि त्यावर अवकाळीचे संकट यामुळे शेती पिकांचे नुकसान होते. त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या देखील करतात. या सर्व गोष्टींमुळे २ जूनची रोटी आज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

SCROLL FOR NEXT