Corona In School Saam TV
देश विदेश

' या' शाळेत फुटला कोरोना बॉम्ब; व्यवस्थापनाने घेतला तात्काळ निर्णय

डेहराडूनमधील एका शाळेत १६ कोविड - 19 चे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे शाळेमध्ये कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डेहराडून : उत्तराखंडातील डेहराडूमधील (Dehradun) एका शाळेमध्ये जवळपास १६ विद्यार्थ्यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. त्यामुळे शाळा प्रशासनाने या विद्यार्थ्यांना शाळेमध्येच तयार केलेल्या कोरोना विलगीकरण कक्षात ठेवलं आहे. 'वेल्हम गर्ल्स स्कूल' मध्ये हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. बुधवारी या शाळेतील मुलांची कोरोना चाचणी केली असता जवळपास १६ विद्यार्थ्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली त्यामुळे डेहराडूनच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने या परिसरात त्यामायक्रो-कंटेनमेंट झोन घोषीत करण्यात आला आहे.

मागील काही दिवसांमध्ये देशभरातील विविध ठिकाणी नव्याने कोरोना रुग्ण वाढायला लागले आहेत. नुकतेच काही दिवसांपुर्वी कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येचा धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशभरातील मुख्यमंत्र्यांसोबत एक कोरोना आढावा बैठक घेतली होती. दिल्लीतील कोरोना रुग्णांच्या संख्येपाठोपाठ आता उत्तराखंडमध्ये देखील कोरोना रुग्ण सापडले आहेत.

हे देखील पाहा -

तसेच डेहराडूनचे (Dehradun) जिल्हा दंडाधिकारी आर राजेश कुमार यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, "या विद्यार्थ्यांपैकी सहा जणांची कोरोना चाचणी मंगळवारीच पॉझिटिव्ह आली होती. तसंच कोरोना बाधित मुलांना शाळेच्या आवारात बांधलेल्या कोरोना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.

दरम्यान, उत्तराखंडमध्ये बुधवारी नवे २३ कोरोना रुग्ण सापडले असून या २३ पैकी १४ डेहराडूनमधील आहेत. मागील काही दिवसांपासून उत्तराखंडमधील कोरोना रुग्णांच्या संख्याने एक अंकी आकडा ओलांडला आहे. याआधी देखील नैनितालमधील एका शाळेत जानेवारीच्या सुरुवातीला ८५ विद्यार्थी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिथे कंटेनमेंट झोन घोषित केला होता.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : महाराष्ट्रात बहुमत कोणाला ? मविआचा प्लान बी तयार

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

SCROLL FOR NEXT