काबूल विमानतळावरून 150 भारतीयांचे अपहरण ?
काबूल विमानतळावरून 150 भारतीयांचे अपहरण ? Saam tv
देश विदेश

काबूल विमानतळावरून 150 भारतीयांचे अपहरण ?

वृत्तसंस्था

भारतासाठी अफगाणिस्तानकडून एक वाईट बातमी आहे. अल-इत्तेहा रुझच्या अहवालानुसार सुमारे 150 लोकांचे अपहरण काबुल विमानतळावरून करण्यात आले आहे. यातील बहुतेक लोक भारतीय असल्याचे सांगितले जात आहे. काबूल विमानतळाजवळ या लोकांचे अपहरण करण्यात आले आहे. अल-इत्तेहा यांनी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, अपहरणकर्ते तालिबानशी जोडलेले आहेत आणि त्यांनी भारतीय लोकांना तारखीलकडे नेले आहे.

दरम्यान, आता यावर आता तालिबान कडून स्पष्टीकरण देण्यात आलय कि, आम्ही 150 भारतीयांचं अपहरण केलं नाही तर विमानतळाच्या आत सुरक्षितरित्या त्यांना नेण्यात आलय. तालिबानचे प्रवक्ते अहमदुल्लाह वसेक यांनी या वृत्ताच खंडन केलय.

काबूल विमानतळाबाहेर 220 भारतीय अडकले;

माहिती आहे की, अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील विमानतळाबाहेर सुमारे 220 भारतीय उपस्थित आहेत, जे आत जाण्याची वाट पाहत आहेत. भारतीयांना बाहेर काढण्यासाठी इंडियन एअरफोर्सचे C17 विमान काबूलला पोहोचले आहे. सर्व भारतीय नागरिक गेल्या सहा तासांपासून वाट पाहत आहेत.

ते सुरक्षित ठिकाणी पोहचण्याचा प्रतीक्षेत आहेत. परंतु त्यांना धोकाही वाटत आहे कारण काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर मोठ्या संख्येने तालिबान उपस्थित आहेत. दरम्यान, C130 हरक्यूलिसने ८५ भारतीयांसह उड्डाण केले आहे. 85 भारतीयांना घेऊन ताजिकिस्तानमध्ये उतरल्याची बातमी आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नाशिक लोकसभा मतदारसंघातून अनिल जाधव भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे; जाणून घ्या

SCROLL FOR NEXT