देश विदेश

'आईला शिवी दिली, मग त्याला टाकलं मारून'; मुलाने मित्राच्या हत्येची दिली कबुली

साम टिव्ही ब्युरो

हरियाणा : आई आणि मुलाचं नातं हे खूपच अमूल्य. आई (mother) आपल्या मुलासाठी काहीही करायला तयार असते. काही मुलं देखील आपल्या आईवर आपला जीव ओवाळून टाकतात. तसाच काहीसा प्रकार हरियाणा (haryana) येथे घडला आहे. मात्र, ही घटना दुर्दैवी असून त्यात एका अल्पवयीन मुलाचा (minor boy) जीव घेण्यात आला आहे. बहादूरगडमध्ये 8 दिवसांपूर्वी एका 10 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या खुनाचे गूढ उकलले आहे. मृत मनीष उर्फ ​​गोलीची हत्या (Crime) त्याच्याच १५ वर्षीय मित्राने केली होती. हे प्रकरण सुभाष नगरचे आहे. हत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलाने सांगितले की, मृताने त्याच्या दिवंगत आईला शिवीगाळ केली होती, त्यामुळे त्याने गोलूची वीट मारून हत्या केली.

पुढे अल्पवयीन मुलाने सांगितले की, खेळत असताना दोघांमध्ये कशावरून तरी भांडण झाले. भांडणाच्या वेळी गोलूने आरोपीच्या आईला शिवीगाळ केली. अल्पवयीन मुलगा इतका भडकला की त्याने त्याच्या मित्राच्या डोक्यावर वीट मारली. त्यामुळे गोलूचा जागीच मृत्यू (Death) झाला. त्यानंतर ओळख लपवण्यासाठी त्याचा मृतदेह पेटवून दिला.

झज्जर जिल्ह्याचे एसपी वसीम अक्रम यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत अल्पवयीन मुलाने गुन्ह्याची कबुली दिली आहे. माझ्या आईला शिवीगाळ केली म्हणून मी तिची हत्या केल्याचे मुलाने चौकशीत सांगितले. सध्या त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. तेथून त्याची बोस्टन जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

हत्या करणारा मृताच्या मामाच्या घरी भाड्याने राहतो
18 एप्रिलच्या रात्री बहादुरगडमधील लाइनपार भागातील सुभाष नगरमध्ये 10 वर्षीय मनीष उर्फ ​​गोलूची हत्या करण्यात आली होती. 19 एप्रिल रोजी सकाळी त्याचा मृतदेह घरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर असलेल्या रिकाम्या प्लॉटमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मारेकऱ्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, गुन्हेगाराचा शोध लागला नाही. यानंतर पोलिसांनी आरोपीची ओळख उघड करणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तपास आणि चौकशीच्या आधारे पोलिसांनी हत्या करणाऱ्यास पकडले. अल्पवयीन मुलगा मृत मनीषच्या मामाच्या घरी भाड्याने राहतो आणि रोज संध्याकाळी मनीषसोबत खेळत असे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruchira Jadhav: अवतरली सुंदरी... रुचिराचा मनमोहक साडी लूक!

Rahul Gandhi: सत्तेत आल्यास 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार, आरक्षणावर राहुल गांधींची मोठी घोषणा

Today's Marathi News Live: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं काँग्रेस कार्यकर्त्यांना पत्र

Dindori Lok Sabha: आधी थोपटले दंड आता मिळवले हात; दिंडोरी लोकसभेतून जे पी गावितांची माघार

Govinda And Krushna Abhishek : कृष्णा- गोविंदा वादाचं नेमकं कारण काय?; गोविंदा जरा स्पष्टच बोलला

SCROLL FOR NEXT