पत्नीने आईसोबत रचला कट, मुसळीने पतीचं फोडलं डोकं; मग...

delhi BJp leader jitu chaudhary murder
delhi BJp leader jitu chaudhary murdersaam tv

दंतारामगड (राजस्थान) : सीकर जिल्ह्यातील खाटूश्यामजी पोलीस ठाण्यांतर्गत जालूंडहून खोराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बेशुद्धावस्थेत सापडलेल्या मुकेश रुलानियाच्या मृत्यूप्रकरणी (murder) पोलिसांनी (police) मृताची पत्नी आणि सासूसह एका साथीदाराला बेड्या (arrest) ठोकल्या आहेत.

एसएचओ रिया चौधरी यांनी सांगितले की, २० एप्रिल रोजी मुकेश रुलानिया बेशुद्धावस्थेत सापडला होता. नंतर डॉक्टरांनी त्याला मृत (death) घोषित केले. कुटुंबीयांनी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा (crime case) दाखल केला.

एसएचओ रिया चौधरी यांना तपास करत असताना मृताची पत्नी आणि तिच्या सासूच्या चौकशीत परस्परविरोधी वक्तव्यावरून संशय आला. त्यानंतर पत्नी कविता, तिचीआई मिंटू देवी आणि तिचा साथीदार रामदेव रणवा यांना ताब्यात घेतले. त्याच वेळी, मृत व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचे तपासात समोर आले आहे. दारू पिऊन तो कुटुंबीयांना मारहाण करत असे, त्याला कंटाळून पत्नी कविता आणि त्याची आई मिंटू देवी यांनी मुकेशचा काटा काढण्यासाठी दीड महिन्यांपासून प्लॅनिंग केले होते.

delhi BJp leader jitu chaudhary murder
अजबच ! चोरट्याने चक्क गॅस सिलिंडरवर मारला डल्ला, पोलीसही झाले थक्क 

19 एप्रिलच्या रात्री मुकेश दारू पिऊन घरी आला आणि मारहाण करू लागला, तेव्हा त्याची पत्नी कविता, त्याची आई मिंटू देवी आणि साथीदार रामदेव यांनी मुकेशच्या गुप्तांगासह पाठीवर आणि छातीवर लोखंडी मुसळीने प्रहार केला. मृत समजून त्याला रामदेव सिंह रणवाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून निर्जन ठिकाणी फेकण्यात आलं.

स्टेशन ऑफिसरने विचारपूस केल्यानंतर पत्नी आणि सासू यांना रडू कोसळलं आणि आपल्याच पतीची हत्या केल्याचं कबुली पत्नीने दिली. महत्वाचे म्हणजे रामदेव हा मृतकच्या शेतात काम करायचा, तसेच मृतकच्या सासऱ्याच्या सज्जनपुरा येथील शेतात भागीदारीने शेतीचे काम देखील करतो. मुकेशला मृत समजून ट्रॉलीत टाकून खोरा मार्गावरील निर्जनस्थळी फेकले होते. त्यामुळे या हत्येच्या प्रकरणात रामदेवचा देखील हात असल्याने त्याच्यावर देखील अटकेची कारवाई करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com