अजबच ! चोरट्याने चक्क गॅस सिलिंडरवर मारला डल्ला, पोलीसही झाले थक्क 

Gas Cylinder
Gas CylinderSaam Tv

गुजरात : चोरीच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या, वाचल्या असतील, पण गॅस सिलिंडर चोरीची बातमी (Gas cylinder robbery) तुम्ही क्वचितच ऐकली असेल. गुजरातमधील सुरतमध्ये अशाच एका चोराला पोलिसांनी अटक (Thief arrested) केली आहे, जो लोकांच्या घरातून गॅस सिलिंडर चोरून त्याची विक्री करायचा. पोलिसांनी चोरट्याकडून १७ गॅस सिलिंडर जप्त केले आहेत. पकडलेला चोर हा व्यवसायाने हिरे कारागीर (Diamond) असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Gas Cylinder
विराट कोहलीबाबत 'RCB' कर्णधार फाफ डुप्लेसीचं मोठं विधान, म्हणाला...

वास्तविक, सुरतच्या सरठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक भागातून गॅस सिलिंडर चोरीच्या घटना पोलिसांकडे येत होत्या. गॅस सिलिंडर चोरणाऱ्या चोरट्याचा पोलीस सातत्याने शोध घेत होते. दरम्यान, पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले, ज्यामध्ये हेल्मेट घातलेला एक व्यक्ती गॅस सिलिंडर चोरताना दिसत आहे. पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला. या अंतर्गत संजय भाई मनिया याला गॅस सिलिंडर चोरी प्रकरणी अटक करण्यात आली.

सरठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एमके गुर्जर यांनी सांगितले की, संजय भाई मनिया हे व्यवसायाने हिरे कारागीर आहेत. गेल्या २ महिन्यांपासून तो गॅस सिलिंडरची चोरी करू लागला होता. अशाप्रकारे त्याने विविध भागातून २५ गॅस सिलिंडर चोरले. त्यापैकी १७ गॅस सिलिंडर पोलिसांनी जप्त केले असून उर्वरित सिलिंडरचा शोध सुरू आहे. संजय मानिया हे चोरीचे गॅस सिलिंडर संजय सावलिया यांना १७०० ते १८०० रुपयांना विकायचा.

शाळेतील मुलाची फी भरण्यासाठी तो चोरी करत असे, असे संजय मनियाचे म्हणणे आहे. यामुळे त्याने चोरीच्या वाममार्ग स्वीकारला होता. मात्र, सरठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम.के. गुर्जर म्हणाले, चोराने स्वतःच्या बचावासाठी केलेला हा युक्तिवाद ग्राह्य धरला जाणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com