Heart Attack News  Saam TV
देश विदेश

Student Death In School: शाळेत वक्तृत्व स्पर्धा, गुरुंबद्दल बोलायला स्टेजवर जाणार तोच घडलं भयंकर; १५ वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकनं मृत्यू

Student Dies Due to Heart Attack at School: देवांश असं त्याचं नाव आहे. दहावीत तो शिकत होता.

साम टिव्ही ब्युरो

Gujarat News Update : गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात मनाला चटका लावून जाणारी दुर्दैवी घटना घडली आहे. एका १५ वर्षीय मुलाचा शाळेत हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धा भरवली होती. त्यात हा मुलगाही गुरुंबद्दल बोलणार होता. भाषणासाठी स्टेजवर जाण्याआधीच अघटित घडलं. या मुलाची प्रकृती अचानक बिघडली. त्याचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला, असे समोर आले आहे. देवांश असं त्याचं नाव आहे. दहावीत तो शिकत होता.

अवघ्या १५ व्या वर्षी मुलाला हिरावून घेतल्यानं आई-वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. अख्खं कुटुंब या धक्क्यातून अद्याप सावरलेलं नाही. दुसरीकडे शाळा व्यवस्थापनही या घटनेने हादरले आहे. देवांशचा मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. देवांशचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. (Marathi Tajya Batmya)

इतक्या कमी वयात हृदयविकाराच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबीय आणि नातेवाइकांना मोठा धक्का बसला आहे. देवांशचे वडील शहरातील मोठे उद्योजक आहेत. देवांश हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. (Latest Marathi News)

गुरुपौर्णिमेला शाळेत वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत देवांशही भाषण करणार होता. गुरुंबद्दल तो आपले विचार मांडणार होता. पण व्यासपीठावर येण्याआधीच त्याची तब्येत बिघडली. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले, असे शाळा व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वीच नवसारीमध्ये एका १७ वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. तनिषा असं तिचं नाव होतं. ती बारावीमध्ये शिकत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT