Bus Driver Heart Attack Video: धावत्या बसमध्ये चालकाला हार्ट अटॅक! दैव बलवत्तर म्हणून वाचले प्रवाशांचे प्राण
>> सुशील थोरात, साम टीव्ही
Bus Driver Heart Attack In Running Bus: धावत्या बसमध्ये चालकाला हार्ट अटॅक आल्यामुळे त्याचं बसवरील नियंत्रण सुटलं, परंतु ही घटना लक्षात येताच काही लोकांनी बसकडे धाव घेतली आणि बस थांबवली त्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. ही धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारनेर आगराच्या धावत्या बसमध्ये अचानक चालकाची तब्येत बिघडल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. पारनेर बस स्थानकाबाहेर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मात्र बसस्टँड जवळील सुपा रोडवरील दुकानदारांनी आणि प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली.
हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला. पारनेर बस स्थानकातून ही बस बाहेर पडताच चालकाला हृदयविकाराचा झटका आला आणि तो स्टेरिंगवर कोसळला. त्यामुळे बसवरील त्याचे नियंत्रण सुटले. (Marathi Tajya Batmya)
तेवढ्यात बाजूलाच असलेले उदय औटी, राजू खोसे, राहुल काळे, अनिल ठोंबरे, विनायक कानडे, नितीन चेडे या दुकानदारांनी बसकडे धाव घेतली आणि केबिनमध्ये चढून बस नियंत्रणात आणली. यावेळेत काहींनी रोडवरील वाहनं आणि लोकांना सावध केलं आणि थांबवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. (Latest Political News)
दरम्यान या बस चालकाला पारनेरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालकाला हृदय विकाराचा झटका आला की आणखी काय झालं हे अद्याप कळू शकले नाही. मात्र दैव बलवत्तर म्हणून प्रवासांचे प्राण वाचले आहे. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.