वृत्तसंस्था Saam Tv
देश विदेश

UP: 13 वर्षीय मुलगी, आधी स्टेशनवर गँगरेप नंतर पोलीस स्टेशनमध्येही बलात्कार!

उत्तर प्रदेशातील ललितपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

वृत्तसंस्था

लखनौ : उत्तर प्रदेशातील ललितपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या मुलीने सांगितलेल्या कथेने या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. रक्षकच जर भक्षक होतो, मग बळी जातो कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणातील पीडितेची कहाणी ऐकून एसपीही चकित झाले आणि तातडीने तपासाचे आदेश दिले. आता या प्रकरणातील आरोपी एसएचओ फरार असून त्याच्यावर कारवाईची फेरी सुरू झाली आहे.

पीडितेच्या आईच्या म्हणण्यानुसार, पाली शहरातील रहिवासी चंदन, राजभान, हरिशंकर आणि महेंद्र चौरसिया यांनी तिच्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला भोपाळला नेले. येथे त्यांनी तीन दिवस सतत तिच्यावर बलात्कार केला, त्यादरम्यान ते तिला स्टेशनजवळील रस्त्यात लपवून ठेवत होते. यानंतर 25 एप्रिल रोजी या चौघांनी तिच्या मुलीला पाली पोलीस ठाण्यातील निरीक्षकाजवळ सोडून पळ काढला.

जबाब घेतल्यानंतर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने केला बलात्कार;

यामध्ये, पोलीस कर्मचाऱ्याने मुलीला तिच्या आई-वडिलांकडे सोपवण्याऐवजी मुलीला तिच्या मावशीच्या ताब्यात दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर, दोन दिवसांनंतर 27 एप्रिल रोजी मुलीला पुन्हा पोलीस ठाण्यात बोलावून तिची जबाब घेण्यात आला. त्याच दिवशी सायंकाळी पोलीस ठाण्यात टिळकधारी सरोज याने मुलीला खोलीत नेले आणि येथे तिच्यावर बलात्कार केला. यानंतर मुलीला पुन्हा मावशीच्या ताब्यात दिले.

पीडितेच्या आईने सांगितले की, एवढेच नाही तर तीन दिवसांनंतर 30 एप्रिलला पुन्हा मुलीला पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले आणि येथे मुलीला चाइल्डलाइनच्या ताब्यात देण्यात आले. यानंतर चाइल्ड लाईनमध्ये पिडीतेचे समुपदेशन केले असता, हा सगळा भयानक प्रकार मुलीने सांगितला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी एसएचओ पाली तिलकधारी सिंग सरोज, चंदन, राजभान, हरिशंकर, महेंद्र चौरसिया आणि एका महिलेविरुद्ध पोक्सो कायदा आणि एससी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील पहा-

या प्रकरणात, अतिरिक्त पोलिस महासंचालक, कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी सांगितले की, या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच त्या निरीक्षकावर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी पाली पोलीस ठाण्यात निरीक्षकासह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 3 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. त्यांनी सांगितले की डीआयजी झाशी यांना घटनास्थळी राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दोषी कोणी असेल, पोलीस कर्मचारी असला तरी सर्वांवर कडक कारवाई केली जाईल. कुणालाही सोडले जाणार नाही, असे ते म्हणाले. एक पथक तयार करण्यात आले असून, त्याच्या अटकेसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उज्ज्वला थिटेंना धक्का, अनगरचा नगराध्यक्ष ठरला; जिल्हा न्यायालयानं नेमका निकाल काय दिला? VIDEO

India Tourism : काश्मीर-मनाली नाही; गुलाबी थंडीत आवर्जून फिरा 'हे' ठिकाण, जोडीदार होईल खुश

Blouse Fitting Tips: पहिल्यांदा ब्लाउज शिवायला देताय? मग परफेक्ट फिटींगसाठी लक्षात ठेवा या ट्रिक्स

Maharashtra Live News Update: आमदार चिखलीकर यांना भविष्यात मोठी जवाबदारी मिळणार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले संकेत

भाजपप्रणित NDA ला मोठा हादरा; घटक पक्षातील प्रमुख नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

SCROLL FOR NEXT