वृत्तसंस्था : अमेरिकेच्या पूर्वेकडील भागातील फिलाडेल्फिया शहरामध्ये सकाळच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली आहे. फिलाडेल्फियाच्या डाउनटाउन मधील N23rd स्ट्रीटच्या ८०० ब्लॉकवरील तिसऱ्या मजल्यावरील घराला भीषण आग (Fire) लागली होती. या घटनेमध्ये ७ मुलांसह १३ जणांचा मृत्यू झाला. फिलाडेल्फिया अग्निशमन (Firefighting) विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आग विझली असताना देखील इमारतीच्या (building) आतून जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू असल्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते. मृतांव्यतिरिक्त अन्य दोघांना गंभीर अवस्थेमध्ये रुग्णालयामध्ये (hospital) हलविण्यात आले आहे.
हे देखील पहा-
आग विझल्यानंतर देखील अनेक अग्निशमन ट्रक घटनास्थळी उभ्या असलेल्या दिसले होते. सध्या अग्निशमन दल जळालेल्या इमारतीमध्ये वाचलेल्यांचा शोध घेत आहेत. ही इमारत फिलाडेल्फिया (Philadelphia) सार्वजनिक गृहनिर्माण प्राधिकरणाची आहे. इमारतीला आग लागल्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू होण्याचे कारण तेथे बसविण्यात आलेल्या स्मोक डिटेक्टरमध्ये बिघाड झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे इमारतीमध्ये उपस्थित असलेल्या लोकांना वेळेतच आगीची सूचना मिळू शकली नाही. इमारतीमध्ये ४ स्मोक डिटेक्टर असून चारही सदोष असल्याचे सांगितले जात आहे.
या आगीची माहिती मिळताच स्थानिक वेळेनुसार सकाळच्या सुमारास अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ५० मिनिटामध्येच आग आटोक्यात आणली आहे. मात्र तोपर्यंत ७ मुलांसह १३ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. बहुतेक मृत इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अडकले होते. तर, इमारतीमध्ये अडकलेले ८ जण वेळेमध्येच बाहेर आल्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. फिलाडेल्फिया सार्वजनिक गृहनिर्माण प्राधिकरणाचे अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीमध्ये २ कुटुंबातील २६ लोक राहत होते. इमारतीची शेवटची आग तपासणी मे 2021 मध्ये करण्यात आली होती आणि त्यावेळी ६ स्मोक डिटेक्टर चालू स्थितीमध्ये आढळून आले होते. सध्या या आगीचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.