हैतीच्या (Haiti) 7.2 रिश्टर स्केलच्या भूकंपात (Earthquake) मृतांची संख्या 1297 वर पोहोचली आहे. जखमींची संख्याही 5700 झाली आहे. हैती या कॅरिबियन देशाला एका शक्तिशाली भूकंपाता धक्का बसला होता, जिथे गावांची गावं उजाड झाली. त्यांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यानंतर हजारो लोक विस्थापित झाले आहेत. भूकंपग्रस्तांचे कडक उन्हाळ्यात थप्पर गेले आहे.
कोरोना महामारी आणि हिंसाचाराच्या घटनांच्या परिस्थितीमध्ये या नैसर्गिक आपत्तीत मदत कार्य करणे कठीण होत आहे. हैतीमध्ये थोड्या दिवसांपुर्वी राष्ट्रपतींची हत्या झाली. हैतीचे पंतप्रधान एरियल हेन्री यांनी देशभरात एक महिन्याची आणीबाणी जाहीर केली आहे. येथील नागरी संरक्षण कार्यालयाच्या मते, सात हजारांहून अधिक घरे पूर्णपणे नष्ट झाली आहेत.
पाच हजार घरांचे नुकसान झाले आहे. यासोबतच शाळा, चर्च, रुग्णालयांचेही नुकसान झाले आहे. संपूर्ण देश कोरोना महामारीशी लढत असताना ही आपत्ती आली आहे. दरम्यान, काल हैती शहर भूकंपाच्या मोठ्या धक्क्याने हादरले होते. शनिवारी हैतीमध्ये 7.2 तीव्रतेचा भूकंप झाल्याचं समोर आलं होतं. काल समोर आलेल्या माहितीनुसार, या भूकंपामध्ये तब्बल ३०४ लोकांचा मृत्यू झाला होता. तर १८०० हून अधिक जास्त लोकं जखमी झाले होते. त्या मृत्यूचा आकडा वाढला आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.