बड्डे आहे कुत्र्याचा अन् खर्च 11 लाखांचा, लाडक्या कुत्र्यासाठी 520 ड्रोन्सचा झगमगाट SaamTV
देश विदेश

बड्डे आहे कुत्र्याचा अन् खर्च 11 लाखांचा, लाडक्या कुत्र्यासाठी 520 ड्रोन्सचा झगमगाट

एका श्वानप्रेमीने आपल्या पाळीव कुत्र्याच्या वाढदिवसाठी (Dog's Birthday) केलेला झगमगाट पाहून अनेकांचे डोळे फिरले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : प्रत्येक माणसांचा छंद काही निराळाच असतो आणि आवडीच्या छंदापायी तो पैशांचा विचार करत नाही याचाच प्रत्येय एका श्वानप्रेमीच्या कृतीतून आला आहे. आपल्या पाळीव कुत्र्याच्या वाढदिवसासाठी (Dog's Birthday) एका व्यक्तीने केलेला झगमगाट पाहून तर अनेकांचे डोळे फिरले आहेत. कारण इतका खर्च तर कोणी स्वत:च्या लग्नात देखील करत नाही हो कारण एका कुत्र्याच्या मालकीनीने आपल्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जवळपास 11 लाख रूपये खर्च केले आहेत.

हा वाढदिवस साजरा करणारी चीनमधील महिला आहे. तसंच वाढदिवस साजरा केलेल्या कुत्र्याचे (Dog) नाव डाऊ डाऊ असून तो चीनच्या (China) हुनान प्रांतातील आहे. दरम्यान सदर महिलेने कुत्र्यावर खर्च केलेली रक्कम पाहता तिचं त्या कुत्र्यावरील प्रेम दिसून येत आहे. शिवाय अकरा लाख खर्च केल्याने या कुत्र्याच्या वाढदिवसाची चर्चा चीनमध्येच नव्हे तर जगभरात सुरु आहे.

हे देखील पहा -

दरम्यान या हौशी मालकिनीने कुत्र्याच्या वाढदिवसाला ड्रोन शो (Drone show) देखील केला होता. या शो मध्ये तब्बल 520 ड्रोनचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. या ड्रोनच्या माध्यमातून आकाशात हॅपी बर्थडे डाऊ डाऊ लिहण्यात आले होते. हा ड्रोन शो जवळपास 30 मिनिटे चालला होता. दरम्यान कुत्र्याच्या वाढदिवसाला Birthday Song ही कुत्र्याच्याच आवाजात रेकॉर्ड केलेले होते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Hill Station: मडगावपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; मुंबईकरांचं फेव्हरेट डेस्टिनेशन

konkan Beach : महाराष्ट्रातील मिनी मालदीव! कोकणातील समुद्राच्या सौंदर्याला तोड नाही, एकदा फेरफटका माराच

Rain Alert: शेतकऱ्यांना दिलासा! राज्यभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज, २३ जिल्ह्यांना इशारा

SCROLL FOR NEXT