जयपुरच्या खासगी रूग्णालयात कॅन्सरग्रस्त १० वर्षीय मुलाला उंदीर चावला. उंदीर चावल्यानंतर पायातून रक्तस्त्राव थांबत नव्हते. मात्र, रक्तस्राव न थांबल्यामुळे दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. पालकांना उंदीर चावल्यामुळे मुलाचा मृत्यू झालं असल्याचं संशय आहे. यावर डॉक्टरांनी नेमकं कारण स्पष्ट केलंय.
रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. संदीप जसुजा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, 'अनेक मीडिया अहवालात मुलाचा मृत्यू उंदीर चावल्यामुळे झाला, असं सांगण्यात आलं. मात्र, मुलाच्या मृत्यूमागे फक्त एक कारण नसून, मुलाचा मृत्यू प्रामुख्यानं सेप्टिसेमिक शॉक आणि अति प्रमाणात संसर्गामुळं झालाय. मुलाला ताप आणि न्यूमोनियाचा देखील त्रास होता', असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.
मीडिया रिपोर्टनुसार, रात्री उशिरा नातेवाईकांना मुलाच्या रडण्याचा आवाज आला. मुलाला बघण्यासाठी नातेवाईक गेले असता, तेव्हा पायाच्या बोटातून रक्त निघत होते. तसेच पायाच्या बाजूनं उंदीर त्याच्या चादरीखालून निघाला असल्याचं आढळून आलं. नंतर शुक्रवारी पहाटे ४ वाजता मुलाचा मृत्यू झाला.
दरम्यान, याप्रकरणी राजस्थान सरकारने तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. तीन दिवसात अहवाल मागवला आहे. यासंदर्भातला अहवाल राज्याचे वैद्यकीय शिक्षण सचिव अंबरीश कुमार यांनी राज्य संचालित एसएमएस मेडीकल कॉलेजच्या प्राचार्यांकडून मागवला आहे.
अधीक्षक जसुजा यांनी सांगितलं, 'उंदीर चावल्यामुळे मुलाचा मृत्यू झालं असल्याचा मुलाच्या आईला संशय आहे. त्यांनी त्याबद्दल नर्सिंग स्टाफला सांगितलं. मात्र, रूग्णाच्या पायावर कुठेही उंदीर चावल्याच्या खुणा नाहीत. मुलाला त्वचेचे अल्सर देखील होते. ज्याच्यावर वेळेवर उपचार देखील झाले.'
एसएमएस मेडीकल कॉलेजच्या प्राचार्यांना जसूजा यांनी पत्र लिहिलं. त्यात काही बाबी स्पष्ट केल्या. पत्रात त्यांनी, 'मुलाच्या आईने उंदीर पाहिलं असावं. मुलाच्या पायातून रक्तस्त्रावामागचं कारण हे असावं' असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यापत्रामध्ये त्यांनी म्हटलं, 'प्लेटलेटची संख्या कमी असलेल्यांना जखमांमधून रक्तस्त्राव होण्याची समस्या असते. हे स्पष्ट होते की, रक्तस्त्राव त्वचेच्या अल्सरमुळे झाला होता. उंदीर चावल्यामुळे नाही.' असं पत्रात त्यांनी म्हटलं. मृत्यू नैसर्गिक असल्यानं शुक्रवारी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्याचं जसूजा यांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.