PM Narendra Modi Jharkhand Visit:  Saamtv
देश विदेश

Vande Bharat Train: एक दोन नव्हे आजपासून १० वंदे भारत ट्रेन! 'या' राज्यांमध्ये धावणार; जाणून घ्या मार्ग, वेळापत्रक अन् A TO Z माहिती

Gangappa Pujari

Narendra Modi launching new Vande Bharat Express: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज झारखंड दौऱ्यावर आहेत. झारखंडच्या जमशेदपूर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील विविध राज्यांसाठी आणखी 10 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामुळे एकाच दिवशी तब्बल १० वंदे भारत ट्रेन भारतीयांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या वंदे भारत ट्रेनमुळे तब्बल १० राज्यांमधील नागरिकांचा प्रवास सुसाट अन् आरामदायी होणार आहे. यामध्ये पुणे-नागपूर वंदे भारत ट्रेनचाही समावेश आहे.

आजपासून १० नवीन वंदे भारत ट्रेन!

मोदी सरकारच्या 'मेक इन इंडिया' संकल्पनेअंतर्गत पहिली Vande Bharat Express Train सुरू करण्यात आली आणि भारताने एक नवा इतिहास घडविला. तेव्हापासून भारतात या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा विस्तार वेगाने होत आहे. दररोज विविध राज्यांमध्ये वंदे भारत ट्रेनचा शुभारंभ होत आहे. अशातच आज देशातील विविध राज्यांना 10 वंदे भारत ट्रेन मिळणार आहेत. जमशेदपूर, झारखंड येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी या ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पहिल्यांदाच एकाच वेळी दहा वंदे भारत गाड्या सुरू होणार आहेत.

कोणकोणत्या राज्यांमधून धावणार?

या 10 वंदे भारत ट्रेन देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधून रेल्वे स्थानकांवरून धावतील. या राज्यांमध्ये झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे. 15 सप्टेंबरपासून धावणाऱ्या 10 वंदे भारत ट्रेनपैकी बहुतांश ट्रेन बिहारमधून जाणार आहेत. ईस्ट कोस्ट रेल्वेच्या म्हणण्यानुसार, १५ सप्टेंबरपासून आणखी तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या ओडिशातून धावतील. ओडिशातून जाणाऱ्या नवीन गाड्या टाटा-बरहामपूर, राउरकेला-हावडा आणि दुर्ग-विशाखापट्टणम वंदे भारत एक्स्प्रेस आहेत. या 3 ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

जाणून घ्या मार्ग...

१. टाटानगर-पाटणा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

२. वाराणसी-देवघर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

३. टाटानगर-ब्रह्मपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

४. रांची-गोड्डा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

५. आग्रा-बनारस वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

६. हावडा-गया वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

७. हावडा-भागलपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

८. दुर्ग -VSKP वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

९. हुबळी-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

१०. पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

दरम्यान, वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रगत ब्रेकिंग सिस्टीम आहे जी प्रवेग आणि गती दोन्ही वाढवते. प्रत्येक कोचमध्ये स्वयंचलित दरवाजे, GPS-आधारित ऑडिओ-व्हिज्युअल प्रवासी माहिती प्रणाली, मनोरंजनासाठी ऑन-बोर्ड हॉटस्पॉट वाय-फाय आणि अत्यंत आरामदायक आसन व्यवस्था आहे. कार्यकारी वर्ग फिरत्या खुर्च्यांसह अतिरिक्त लक्झरी ऑफर करतो. शिवाय, पर्यावरणीय शाश्वततेला चालना देण्यासाठी, ट्रेनमध्ये रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम समाविष्ट आहे जी 30% पर्यंत विद्युत उर्जेची बचत करू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : तिसऱ्या आघाडीवर शिक्कामोर्तब; बघा काय म्हणाले बच्चू कडू

Ahmednagar Firing Case : कोपरगावात भरदिवसा गोळीबार, VIDEO

Bachelor Party Destination : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय? 'या' ठिकाणी प्लान करा बॅचलर पार्टी

Congress Protest: राहुल गांधींचा अपमान सहन करणार नाही, वाचाळवीरांना लगाम घाला; काँग्रेसचं आंदोलन, भाजपला इशारा

Maharashtra News Live Updates: मी निवडणूक लढण्यावर ठाम - माजी पोलीस आयुक्त संजय पांडे

SCROLL FOR NEXT