Working Hours Saam Tv
देश विदेश

Working Hours: नोकरदार वर्गासाठी मोठी बातमी, आता ९ नाही तर १० तास करावं लागणार काम

Private Sector Employees: खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आता कामाच्या तासांत आणखी १ तासाने वाढ करण्यात आली आहे. आता ९ ऐवजी १० तास काम करावे लागणार आहे.

Priya More

नोकरदार वर्गासाठी महत्वाची बातमी आहे. आंध्र प्रदेश सरकारने खासगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कामगार कायद्यांमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला. या बदलानुसार, आता कर्मचाऱ्यांना ९ तासांऐवजी १० तास काम करावे लागणार आहे. हा नवीन नियम आंध्र प्रदेश कारखाना कायदा अंतर्गत लागू करण्यात आला आहे आणि राज्य मंत्रिमंडळाने या निर्णयाला मान्यता देखील दिली आहे.

आंध्र प्रदेशमध्ये पूर्वी खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी काम करण्याची मर्यादा ही दररोज ८ तास इतकी होती. जी १० वर्षांपूर्वी ९ तासांपर्यंत वाढवण्यात आली होती. आता आंध्र प्रदेश कारखाना कायद्यातील कलम ५४ अंतर्गत ही मर्यादा आणखी एका तासाने वाढवण्यात आली आहे. आता कर्मचाऱ्यांना १० तास काम करावे लागणार आहे. पूर्वी ५ तासांच्या कामानंतर अर्धा तासाचा ब्रेक अनिवार्य होता. तो आता ६ तासांच्या कामानंतर एक तासाचा ब्रेक करण्यात आला आहे.

त्याचसोबत आता ओव्हरटाईमची कमाल मर्यादा देखील बदलण्यात आली आहे. पूर्वी ओव्हर टाईमची कमाल मर्यादा ७५ तास होती जी आता १४४ तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयावर राज्याचे माहिती आणि जनसंपर्क मंत्री के. पार्थसाधी यांनी सांगितले की, हे बदल सरकारच्या व्यवसाय सुलभता धोरणाचा भाग आहे. या नियमांमध्ये काही शिथिलता दिल्याने आंध्र प्रदेशात अधिक गुंतवणूक येईल आणि व्यवसाय करणे सोपे होईल. या नव्या नियमांमुळे खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम होईल.

सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा कामगार संघटनांनी विरोध केला आहे. कामगार संघटनेने सांगितले की, 'नवीन नियमांमुळे कारखाना मालक कामगारांना निर्धारित वेळेपेक्षा जास्त काम करायला लावू शकतात. म्हणजेच दोन तास जास्त काम करायला सांगतली. यामुळे कर्मचाऱ्यांना दररोज १२ तास किंवा त्याहून अधिक तास काम करावे लागू शकते. त्यामुळे त्यांच्या आरोग्यासोबत वैयक्तिक आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बामणोली ड्रग्स प्रकरणावर सुषमा अंधारे यांच्या आरोपांना मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर

Malti Chahar: बापाच्या वयाच्या डायरेक्टरने किस केला, मालती चहरचा धक्कादायक आरोप; बिग बॉस फेमसोबत नेमकं काय घडलं?

फास्ट फूड अन् ऑनलाइन जेवणामुळे कॅन्सर, डॉक्टरांनी सांगितला नेमका धोका, वाचा काय म्हणाले तज्ज्ञ

Water Shortage : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुढील २४ तास पाणी राहणार बंद, जाणून घ्या कसं असेल नियोजन

Red Dress For Christmas: ख्रिसमस पार्टीसाठी रेड ड्रेसचे 5 लेटेस्ट पॅटर्न; तुम्ही दिसाल एकदम कडक

SCROLL FOR NEXT