Zilla Parishad Recruitment 2023 Saam TV
मुंबई/पुणे

Zilla Parishad Recruitment 2023: तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; जिल्हा परिषदांमध्ये विविध जागांसाठी मोठी भरती

या समित्यांमध्ये ग्रामविकास खात्यातील उच्चशिक्षित आणि अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Pune News: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषदांमध्ये लवकरच विविध जागांसाठी भरती होणार आहे. १९ हजार पदांसाठी ही भरती होत आहे. गेल्या ७ वर्षांपासून जिल्हा परिषदांमध्ये भरती झाली नव्हती. त्यामुळे विद्यार्थांना या भरतीची बराच काळ वाट पहावी लागली आहे. (Zilla Parishad Recruitment)

या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी ग्रामविकास खात्याने विविध सहा राज्यस्तरीय समित्यांची स्थापना केली आहे. या समित्यांमध्ये ग्रामविकास खात्यातील उच्चशिक्षित आणि अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

सर्व जिल्हा परिषदांमधील (Zilla Parishad) मिळून १८ हजार ९३९ रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. यासाठीची जाहिरात येत्या दोन आठवड्यात प्रसिद्ध करण्याचा निश्‍चय ग्रामविकास विभागाने केला आहे.

२०१६ पासून रखडली होती भरती

जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांची सन २०१६ पासून आतापर्यंत एकदाही भरती झालेली नाही. पूर्वी ही प्रक्रिया दरवर्षी जुलै महिन्यात सुरु केली जात असे. दरम्यान, क वर्गीय रिक्त पदांची भरती करण्यासाठी राज्य सरकारने महाभरती अंतर्गत मार्च २०१९ आणि आॅगस्ट २०२१ अशी दोन वेळा भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. परंतु या दोन्ही भरती प्रक्रिया राज्याच्या ग्रामविकास विभागाने आक्टोबर २०२२ मध्ये रद्द केल्या होत्या. शिवाय या दोन्ही भरती प्रक्रियेत नोकरीसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यामुळे आता लवकरच १८ हजार ९३९ रिक्त जागांसाठी भरती होणार आहे.

या विभागात होणार भरती

पाणी पुरवठा आणि स्वच्छता

सामान्य प्रशासन विभाग

अन्न आणि नागरी पुरवठा

सार्वजनिक बांधकाम विभाग

वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT