Maharashtra Police Bharti: अन् पोलीस व्हायचं स्वप्न अर्धवटच राहिलं; मैदानी चाचणी देताना उमेदवाराचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai News : पोलीस भरतीमध्ये मैदानी चाचणी देत असताना एका उमेदवाराचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra Police Bharti
Maharashtra Police BhartiSaam TV
Published On

संजय गडदे

Mumbai Police Bharti: पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या कल्याण येथे राहणाऱ्या तरुणाचा मुंबईत कालिना मैदानावर पोलीस भरती दरम्यान मृत्यू झाला आहे. मृत पावलेला तरुण हा निवृत्त फौजी असून पोलीस बनण्याचे स्वप्न उराशी घेऊन मुंबईत आला होता. मात्र त्याचे पोलीस बनण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले आहे.सचिन कदम हा तरुणाचा धावताना कोसळल्याने काल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मुंबईत सध्या पोलीस भरतीसाठी कालिना ग्राऊंडवर मैदानी परीक्षा सुरू आहे. भरतीसाठी आलेल्या खेड तालुक्यातील दहिवली येथील रहिवासी असलेले सचिन कदम हे लष्करातून निवृत्त झाले आहेत. मागील काही दिवसांपासून ते कल्याण येथे वास्तव्यास होते. निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी पोलीस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून जोरदार तयारी सुरू केली.

Maharashtra Police Bharti
AMU Dog Attack : हृदय पिळवटून टाकणारी घटना! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात शिक्षकाचा मृत्यू; धक्कादायक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

काल ते पोलीस भरतीसाठी कालिना मैदानात परीक्षेसाठी आले होते. त्यानुसार १६०० मीटर धावताना ते तिसऱ्या राऊंडला कोसळले. त्याला तत्काळ जवळच्या वी.एन. देसाई रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

तापमानाचा पारा वाढलेला असल्यानेच धावताना भरतीसाठी आलेल्या तरुणांना भोवळ येण्याचे प्रमाण वाढले आहे. या आधी देखील १७ फेब्रुवारी रोजी वाशीमहून पोलीस भरतीसाठी आलेल्या गणेश उगले या तरुणाचा कालीना येथील मैदानात धावताना कोसळून मृत्यू झाला होता. तसेच अमर सोलंकी या अमरावतीच्या तरुणाचाही याच मैदानात २२ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com