झिका विषाणूचा रुग्ण आढळलेल्या बेलसर येथे प्रशासनाकडून उपायोजना
झिका विषाणूचा रुग्ण आढळलेल्या बेलसर येथे प्रशासनाकडून उपायोजना  saam tv
मुंबई/पुणे

झिका विषाणूचा रुग्ण आढळलेल्या बेलसर येथे प्रशासनाकडून उपायोजना

पुण्याहून सागर आव्हाडसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे राज्यातील पहिला झिका विषाणू बाधित रुग्ण आढळून आला आहे त्यामुळे आरोग्य विभागाच्या यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत, यानंतर आता तातडीने स्थानिक प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाय योजनांना सुरुवात करण्यात आली आहे. बेलसर गावात डासांची उत्पत्ती वाढू नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहेत, गावामध्ये सर्वे करून ताप सदृष्य आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत का हे देखील पाहण्यात येत आहे, त्याचबरोबर आरोग्य विभागामार्फत नागरिकांकडे असलेल्या पाणी साठवण्याच्या टाक्यांची पाहणी करण्यात येत आहे, ज्या ठिकाणी जास्त पाणी साठवले जाते अशा ठिकाणी आरोग्य विभागाकडून गप्पी मासे सोडण्यात येत आहेत.

तालुका वैद्यकीय अधिकारी उज्वला जाधव यांनी गावाची पाहणी केलीय, तसेच लोकांमध्ये या विषाणूबाबत माहिती व्हावी म्हणून ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. पुढील काळात या आजाराचे रुग्ण वाढणार नाहीत याबाबत स्थानिक प्रशासनाच्या वतीने काळजी घेण्यात येत आहे, झिका विषाणूचे रुग्ण आढळून आले तरी लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे

Edited by: Ashwini jadhav kedari

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruturaj Gaikwad Statement: चेन्नईचं नेमकं चुकलं तरी कुठं? कर्णधार ऋतुराज गायकवाडने सांगितली पराभवाची कारणं

Nawazuddin Siddiqui Birthday : मेडिकल केमिस्ट- वॉचमॅन ते सुपरस्टार; जाणून घ्या नवाजुद्दीन सिद्दीकीचा संघर्षमय प्रवास

Today's Marathi News Live: मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाच्या इंजिनला भीषण आग

Chakan Gas Tanker Explosion: पुण्यात गॅस टँकरचा स्फोट कसा झाला?, समोर आली धक्कादायक माहिती

Milk Powder : दूध नसल्यास तुम्हीसुद्धा मिल्कपावडरचा जास्त वापर करता? वाचा आरोग्यावर होणारा परिणाम

SCROLL FOR NEXT