मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central Railway) दिवा ते कळवा दरम्यान लोकलच्या दरवाजात एका तरुणाला महागात पडले आहे. लोकल (Local) ट्रेनला प्रचंड गर्दी असल्याने काही तरुण दरवाज्याला लटकत होती. त्यावेळी एका तरुणाचा हात सुटला आणि तो ट्रॅकवर पडला. ट्रॅकवर पडल्याने सदर तरुण गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता ही घटना घडली आहे. त्यानंतर सदर तरुणावर कळव्यामधील शिवाजी रुग्णलयात उपचार सुरू आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ डेक्कन क्विनमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवासी व्यक्तीने कॅमेरा कैद केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ( Local train Accident News In Marathi )
मिळालेल्या माहितीनुसार, लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे काही तरुण लोकलच्या मोटर कोचच्या डब्ब्याला लटकून मुंबईच्या दिशेने जात होते. त्यावेळी एका तरुणाचा हात सटकला. त्यामुळे त्या तरुणाला पाय आणि हाताला लागल्याने जखमी झाला आहे. दानिश जाकीर हुसैन खान असे जखमी तरुणाचे नाव असून तो कळव्यात राहणारा आहे. दानिश खान १८ वर्षीय तरुण पीओपी सारखे मजुरीचे काम करत असून कळवा येथून दादर असा प्रवास करत होता. या दरम्यान त्याचा आत्तेभाऊ आणि आणखी काही नातेवाईक त्याच्यासोबत या डब्ब्याला लटकले असल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे.सध्या हा जखमी असून त्याच्यावर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्या हाताला आणि पायाला प्लास्टर लागले आहे. सदर झालेला अपघात हा स्वत:च्या निष्काळजी पणामुळे झाला असल्याचे जखमी इसमाने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
लोकलच्या दरवाजांवर लटकणाऱ्या आणि स्टंटबाजी करणाऱ्या प्रवाशांविरोधात रेल्वे पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून लोकल ट्रेनच्या दरवाजावर लटकणाऱ्या आणि स्टंटबाजी कारवाई थंडावली असल्याचे दिसून येत आहे. आज गुरुवारी झालेल्या अपघातामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.