Young Women Killed By Boyfriend Saam Tv
मुंबई/पुणे

Pimpari Crime: लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये वाद, प्रियकरानं प्रेयसीला संपवलं, मृतदेह रिक्षातून तिच्या आईच्या घरासमोर ठेवला

Young Women Killed By Boyfriend: पिंपरी-चिंचवडमध्ये प्रियकराने प्रेयसीची हत्या केली. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Priya More

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रियकराने प्रेयसीची हत्या केलीची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या करून प्रेयसीचा मृतदेह रिक्षातून नेऊन तिच्या आईच्या घरासमोर ठेवण्यात आला. आरोपी प्रियकर फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या शिवानी सुपेकरचे (२६ वर्षे) विनायक आवळेसोबत प्रेमसंबंध होते. दोघेही गेल्या दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. रात्री उशिरा शिवानी आणि विनायक यांच्यामध्ये वाद झाला. या वादामध्ये विनायकने टोकाचे पाऊल उचलले आणि गळा आवळून शिवानीची हत्या केली. शिवानीची हत्या करणारा तिचा प्रियकर रिक्षाचालक आहे.

शिवानीची हत्या केल्यानंतर विनायकने रात्री उशिरा तिचा मृतेदह रिक्षातून नेला आणि तिच्या आईच्या घरासमोर ही रिक्षा उभी केली. त्यानंतर विनायकने घटनास्थळावरून पळ काढला. सकाळी रिक्षामध्ये शिवानीचा मृतदेह पाहून एकच खळबळ उडाली. शिवानीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. वाकड पोलिसांनी आरोपी विनायक आवळेविरोधात गुन्हा दाखल केला असून ते त्याचा शोध घेत आहेत. सध्या या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT