Sindhudurg News:  नारळी पौर्णिमा सणाला मोठी दुर्घटना, समुद्रात बोट उलटली; तिघे बुडाले
Boat Overturned In Sea At MalvanSaam Tv

Sindhudurg News: नारळी पौर्णिमा सणाला मोठी दुर्घटना, समुद्रात बोट उलटली; तिघे बुडाले

Boat Overturned In Sea At Malvan: समुद्रामध्ये निर्माण झालेल्या धुक्यांमुळे बोट दगडाला आपटली. त्यानंतर ही बोट समुद्रात पलटी झाली आणि बोटीवरील चारही खलाशी समुद्रात बुडाले.
Published on

नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सण राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. अशातच सिंधुदुर्गमध्ये नारळी पौर्णिमा सणाला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. मालवणमध्ये मासेमारी बोट बुडून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तिघांचे देखील मृतदेह सापडले असून हे सर्व खलाशी आचराचे असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आचरा येथील चार खलाशी मासेमारीसाठी रविवारी रात्री सर्जेकोट समुद्रात गेले होते. समुद्रामध्ये निर्माण झालेल्या धुक्यांमुळे बोट दगडाला आपटली. त्यानंतर ही बोट समुद्रात पलटी झाली आणि बोटीवरील चारही खलाशी समुद्रात बुडाले. यामधील ३ खालाश्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.

या खलाशांपैकी एक खलाशी पोहत पोहत समुद्रकिनारी पोहचला. त्याने घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर समुद्रात बुडालेल्या तिन्ही खलाशांचा शोध घेण्यात आला. या तिन्ही खलाशांचे मृतेदह सापडले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत. रुग्णालयाबाहेर खलाश्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे.

या दुर्घटनेमध्ये सर्जेकोट सोसायटीचे चेअरमन गंगाराम आडकर यांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त बोट गंगाराम आडकर यांचीच होती. आडकर हे चौके विद्यालयातून सेवानिवृत्त झाले होते. या घटनेमुळे आडकर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून नारळी पौर्णिमेच्या दिवशी सर्जेकोट गावावर शोककळा परसरली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com