तक्रारसाठी गेलेल्या तरुणाला पोलिसांकडून मारहाण अजय दुधाणे
मुंबई/पुणे

तक्रारसाठी गेलेल्या तरुणाला पोलिसांकडून मारहाण

अंबरनाथ मध्ये पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या, एका तरुणाने पोलिसांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उल्हासनगर : अंबरनाथ Ambernath मध्ये पोलीस Police ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या, एका तरुणाने पोलिसांनी आपल्याला बेदम मारहाण Beating केल्याचा आरोप केला आहे. या मारहाणीत तरुणाच्या कानाचा पडदा फाटला असून, त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. पोलिसांनी मात्र मारहाण झाल्याचे, आरोप फेटाळून लावले आहे.

अंबरनाथ पश्चिमेला राहणारा सुमेध वेलायुधन हा तरुण त्याच्या बहिणीसह सोमवारी रात्री अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेला होता. यावेळी आधी खाडे नामक अधिकाऱ्यांनी authorities त्याला बाहेर थांबण्यास सांगितले होते. मात्र, नंतर पाटील नामक एका कॉन्स्टेबलनी त्याला आतमध्ये बोलावले. मात्र, त्याचवेळी खाडे यांनी त्याला आतमध्ये कसे काय आला? अशी विचारणा केली होती.

हे देखील पहा-

यावर सुमेध वेलायुधन हा त्याच्या बहिणीला बोलण्याचा प्रयत्न केले असता. खाडे यांनी सरळ सुमेधला लगेचच मारहाण करायला सुरुवात केल्याचा आरोप सुमेध वेलायुधन याने यावेळी केला आहे. खाडे यांनी मला मारत मारत लॉकअपकडे नेले आणि इतक्या जोरात कानाखाली मारली, की माझ्या कानाला इजा झाली आहे, असा आरोप सुमेध वेलायुधन याने केले आहे.

बर्मन यांनी रात्री याबाबत पोलीस दलाच्या वरिष्ठाना ट्विट Tweet केल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तालयाने Commissionerate याची त्वरित दखल घेतली आहे. दरम्यान, सकाळी सुमेध हा उल्हासनगरच्या Ulhasnagar मध्यवर्ती रुग्णालयात hospital गेला असता, त्याच्या कानाचा पडदा फाटल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

तसेच यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याने त्याला कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात Chhatrapati Shivaji Maharaj Hospital रेफर करण्यात आले आहे. या प्रकारानंतर सुमेध वेलायुधन याने त्याला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. अंबरनाथ सिटीझन फोरमचे सत्यजित बर्मन यांनी संबंधित या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांना या संदर्भात विचारणा केली असता, त्यांनी पोलिसांनी कुणालाही मारहाण केले नसल्याचे यावेळी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंवरून मविआत बिघाडी; मुंबईत कॉग्रेसचा स्वबळाचा नारा?

Mahayuti: महायुतीचं ठरलं! मुंबईत एकत्र,राज्यात स्वतंत्र, विजयाची रणनिती काय?

Cough Syrup: कफ सिरपनं घेतला आणखी एकाचा जीव; दोन चमचे औषध प्यायल्यानंतर महिलेनं सोडला जीव, रुग्णालयातच घडला धक्कादायक प्रकार

Microwave: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने होतात 'हे' परिणाम

Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

SCROLL FOR NEXT