पुणे : पुण्यामधील Pune हडपसर Hadapsar परिसरात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका तरुणाने आपल्या धाकट्या भावाची निर्घृणपणे हत्या Brother brutal murder करण्यात आली आहे. आरोपी तरुणाने आपल्या सख्ख्या भावाची झोपलेल्या जागीच पंख्याच्या पात्याने गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. ही अमानुष घटना उघडकीस येताच परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले, या घटनेचा पंचनामा करण्यात आला. तसेच आरोपी भावाला बेड्या ठोकल्या Accused brother arrested आले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. बाबू ऊर्फ प्रदीप शिवाजी गवळी असे हत्या झालेल्या 23 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो हडपसर परिसरात १५ नंबर गल्ली या ठिकाणचा रहिवासी आहे.
हे देखील पहा-
तो मुळचा तूळजापूर येथील रहिवासी असून पुण्यात आपला मोठा भाऊ आणि वहिनीबरोबर राहत होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 28 वर्षीय भावाचे नाव मनोज शिवाजी गवळी असून तो ट्रॅव्हल्सच्या गाड्या सोडण्याचे काम करत असत. तर मृत भाऊ प्रदीप हा रिक्षाचालक असून त्याला विविध प्रकारचे व्यसने होती. त्यामुळे तो रिक्षा चालवून मिळालेला सर्व पैसा विविध व्यसनांसाठी खर्च करत असायचा. स्वत: जवळील पैसे संपल्यावर मृत प्रदीप आपला भाऊ मनोजकडे पैशांची मागणी करायचा. सतत प्रदीपला पैसे देऊन मनोजच्या मनात त्याचाविषयी राग निर्माण झाला होता.
दुसरीकडे, प्रदीप हा त्यांच्यासोबत राहतो, हे मनोजच्या पत्नीला आवडत नव्हतं. दरम्यान, मनोजची पत्नी आपल्या माहेरी गेली होती. तसेच मोठा भाऊ मनोज गवळी आपला धाकटा भाऊ प्रदीप याच्या व्यसनांना खूप कंटाळलेला होता. यातून त्याने घरी कोणी नसताना फायदा घेऊन प्रदीपची निर्घृण हत्या केली आहे. सोमवारी रात्री मृत प्रदीप गाढ झोपी असतानाच, आरोपी मनोजने पंख्याच्या पात्याने गळा चिरून त्याचा खून केला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी भाऊ मनोजला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.