Pune crime news  saam tv
मुंबई/पुणे

Pune : कर्ज फेडण्यासाठी लोन अ‍ॅपकडून दबाव; पुण्यात तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

सोहेल शेख (वय 25, विमाननगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune Crime News : पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोन अ‍ॅपवर होणाऱ्या सततच्या बदनामीमुळे 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या केली आहे. सोहेल शेख (वय 25, विमाननगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोहेलचे वडील जावेद शेख यांनी पुणे पोलिसांत तशी तक्रार दाखल केली आहे. (Pune Today News)

प्राप्त माहितीनुसार, सोहेल याने काही महिन्यांपूर्वी वेग वेगळ्या लोन अ‍ॅपद्वारे कर्ज घेतले होते. एक कर्ज फेडण्यासाठी तो दुसरे लोन घ्यायचा. कर्जाची रक्कम वाढतच गेल्याने अखेर सोहेलला कर्ज फेडणे अशक्य झाले. घेतलेल्या कर्जाची तो वेळेवर परतफेड करू शकला नाही. त्यामुळे त्याला धमक्यांचे आणि शिवीगाळ करणारे फोन येत होते.

इतकंच नाही तर तुझी बदनामी केली जाईल, असे देखील संबधित लोन अ‍ॅपद्वारे सांगण्यात येत होते. या त्रासाला कंटाळून सोहेल शेख याने राहत्या घरी आत्महत्या केली. दरम्यान, सोहेलचे वडील जावेद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात

Success Story: शाळेसाठी दररोज ६ किमी पायपीट; शेतातही केले काम; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

Saturday Horoscope: पाच राशींच्या जीवनात येणार आनंदी-आनंद; होणार धन वर्षाव, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Bhadrapada Amavasya 2025: आजच्या शनी अमावस्येचं महत्त्व जाणून घ्या; 'या' चुका करणं टाळा

Pune: बैलगाडा शर्यतीत अपघाताचा थरार, तरुण खाली पडला अन्..., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT