
राहुल गांधींनी राजुरात ६८५३ मतं वाढवल्याचा आरोप केला.
हा आरोप चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघासंदर्भात आहे.
काँग्रेसकडून हा निवडणूक गैरव्यवहाराचा मुद्दा उचलला गेलाय.
कर्नाटक आणि उत्तर प्रदेशपाठोपाठ व्होटचोरीच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींनी आपला मोर्चा चंद्रपुरच्या राजुरा मतदारसंघाकडे वळवलाय.. विधानसभा निवडणुकीत राजुरा मतदारसंघात तब्बल 6 हजार 853 मतदार वाढवल्याचे पुरावेच राहुल गांधींनी सादर केले. खरंतर चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा हा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेला अत्यंत चुरशीचा मतदारसंघ. या मतदारसंघात 3 लाख15 हजार 73 मतदार आहेत. त्यातील 6 हजार 853 मतं वाढवल्याचा आऱोप गांधींनी केलाय.
तर हा घोटाळा एका बुथ लेव्हल ऑफिसरच्या काकाचं नाव वगळल्याचं लक्षात आल्यानं उघड झाल्याचं गांधींनी म्हटलंय.तर काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुभाष धोटेंनी या आरोपांना दुजोरा दिलाय. तसंच आयोगाकडे वाढीव मतांबाबत तक्रार करुनही कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. मात्र भाजपचे आमदार देवराव भोंगलेंनी राहुल गांधींचा दावा फेटाळून लावलाय.
खरंतर ज्या राजुरा मतदारसंघावरुन महाभारत सुरुय. त्या राजुरा विधानसभेला कुणाला किती मतं मिळाले? पाहूयात. राजुरा मतदारसंघात काँग्रेसच्या सुभाष धोटेंचा 3 हजार 54 मतांनी पराभव झाला.. निवडणुकीत भाजपचे विजयी उमेदवार देवराव भोंगलेंना 72 हजार 882 मतं तर काँग्रेसच्या सुभाष धोटेंना 69 हजार 828 मतं मिळालेत. राहुल गांधींच्या आरोपानंतर बिहार प्रमाणेच महाराष्ट्रातही गुप्त पद्धतीने मतदार फेरतपासणी झाली आणि त्यातूनच काँग्रेसच्या मतदारांना वगळल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.