Young Inspiration network
Young Inspiration network  saam tv
मुंबई/पुणे

young inspiration network : केंद्रीय कॅबिनेट समितीचे पदाधिकारी मायदेशी परतले; विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी केली चर्चा

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : ‘सकाळ ’ (Sakal) माध्यम समूहाचे ‘यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) च्या वतीने केंद्रीय कॅबिनेट समितीचे पदाधिकारी दिल्ली, आणि जम्मू काश्मीर अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून सामाजिक सलोख्याचे भागीदार ठरले आहेत. जम्मू-काश्मीरच्या अभ्यास दौऱ्यात सामाजिक, राजकीय , कला, क्रीडा, शैक्षणिक, प्रशासकीय, कृषी व औद्योगिक क्षेत्रातील विविध तज्ञांशी चर्चा करून सखोल माहितीच्या आधारे अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल देशाचे महामहीम राष्ट्रपती व पंतप्रधानांना महोदयांना दिला जाणार आहे.

या भेटीदरम्यान काश्मीर येथील लाल चौक भागातील मराठी व्यावसायिक दत्तात्रय सूर्यवंशी, धनाजी पाटील व इतर सहकाऱ्यांची भेट घेतली. २३ वर्षांपासून सातत्याने हा मराठी माणसांचा ग्रुप या भागात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा करत आहे. यामुळे मराठी (Marathi) माणसांना एकत्रित आणण्यासाठीचे व्यासपीठ निर्माण झाल्याने एकमेकात आपुलकीचे आणि सहकार्याचे वातावरण तयार झाले आहे.

'ह्युमन वेल्फेअर वॉलेंटेरी ऑर्गनायझेशन' चे संस्थापक फिरोज अहमद यांनी पर्यावरण, शेती, बाल संरक्षण, महिला संरक्षण तसेच शासन स्तरावर विविध अडथळे दूर करण्यासाठी समाज उपयोगी काम करत असल्याचे दिसून आले.

पीडीपी पक्षाचे प्रवक्ते तथा माजी आमदार डॉ. हरबक्ष सिंग यांची भेट घेतली असता सध्या राष्ट्रपती राजवट असल्या कारणास्तव निवडणूक प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर अनेक अडचणी जनसामान्य लोकांना येत आहेत. राजकारणात तरुणाईला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ३७० कलम रद्द झाल्यानंतर अनेक समस्या उद्भवत आहेत. समाजजीवनावर त्याचे होणारे चांगले आणि वाईट परिणाम अशी सविस्तर माहिती यावेळी त्यांनी दिली. महाराष्ट्रातील राजकीय सद्यस्थितीचा आढावा देखील यिन पदाधिकाऱ्याकडून डॉ. हरबक्ष यांनी जाणून घेतला.

काश्मीर चेंबर्स ऑफ कॉमर्स कमिटीचे अध्यक्ष शेख आशिक हे तेथील युवा उद्योजकांना सोबत घेऊन विविध आव्हानांना तोंड देत आपला व्यवसाय अधिक सक्षमपणे चालवत आहेत. वारंवार होणारे दहशतवादी हल्ले, सतत पडणारा बर्फ त्याचा दळणवळणावर होणारा परिणाम अशा अनेक समस्यांना तोंड देत आपला उद्योग, व्यवसाय ही मराठी माणसं सक्षमपणे चालवत आहेत.

दिल्ली पब्लिक स्कूल श्रीनगरचे संस्थापक विजय धर यांची भेट घेतली असता त्यांच्या शाळेवर दहशतवादी हल्ला झाला होता तरीही आज शाळा उत्तमपणे चालू आहे. या शाळेत गरजू मुलांचं संगोपन केलं जात असून स्पेशल चाईल्ड साठी " लर्निंग रिसोर्स सेंटर" केले आहे.काश्मीर भागातील दहा जिल्ह्याचे विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. सध्या या शाळेची विद्यार्थी संख्या ५ हजाराच्यांवर गेली आहे. धर यांनी राजीव गांधी यांच्या सोबत सक्रियपणे काम केलेलं आहे.

काश्मीर पंडितांचे नेतृत्व करणारे संजय टिक्कु सात वेळा अतिरेकी हल्ल्यातुन बचावले आहेत. काश्मीर पंडितांचे होणारे पलायन व त्यांची कौटुंबिक, राजकीय परिस्थिती व कलम ३७० चा झालेला परिणाम याची सविस्तर माहिती संजय टिकू यांनी यिन पदाधिकाऱ्यांना दिली.

मूळ महाराष्ट्राचे असलेले विभागीय आयुक्त पांडुरंग पोळे यांची भेट घेतली असता त्यांनी काश्मीर मधील प्रशासकीय यंत्राना, ३७० नंतर वाढलेल पर्यटन व प्राशकीय कामातले बारकावे सांगितले. काश्मीर मधील लोकांचा प्रशासकीय यंत्रणेतील सहभाग येथील लोकांची शैक्षणिक सद्यस्थिती, मूलभूत सुविधा प्रत्यक्ष सर्व स्तरापर्यंत पोहोचवाव्यात यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

याच वेळी पीडीपी पक्षाचे युवक अध्यक्ष वाहिद पारा व माजी आमदार अजाज मीर याची भेट झाली. ते काश्मीर च्या क्रीडा क्षेत्रात काम करीत आहेत. अनेक नाविन्यपूर्ण योजना या भागात राबविण्यावर त्यांचा भर आहे.

सोफोर ॲपल प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष अदील मलिक व उपाध्यक्ष रामदास खोपडे यांच्या कंपनीला भेट दिली असता रामदास खोपडे हे मूळचे पुण्यातील आहेत. ते काश्मीर मधील सफरचंद हे महाराष्ट्रात आणून त्यांना चांगला भाव देण्यासाठी व सफरचंद पीक वाढीसाठी काम करत आहेत. काश्मीर मधील शेतकऱ्यांच्या पिकाला दलाल विरहित माल मिळावा या साठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक युवकांना रोजगार मिळाला आहे.

या संपूर्ण काश्मीर दौऱ्यात यिन पदाधिकाऱ्यांना विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना भेटून तेथील सामाजिक सलोखा, उद्योग व्यवसाय, आरोग्य, शिक्षण, अर्थकारण, दहशतवाद, नैसर्गिक साधन संपत्ती, पर्यटन दळणवळण व्यवस्था, कृषी क्षेत्राचा होत असलेला विस्तार, शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बदल जवळून अनुभवता आला.

काश्मीर परिसर सुंदर जरी असला तरी तेथील लोकांचे दुःख समस्या आणि सद्यस्थिती प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच कळते असा सविस्तर अभ्यास यिनच्या पदाधिकाऱ्यांनी या दौऱ्यानिमित्त केला.

या सोबतच ऐतिहासिक दिल्लीमधील लाल किल्ला त्या भोवती असलेले राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण व पर्यटन याविषयी सविस्तर अभ्यास केला.

या दौऱ्यासाठी महाराष्ट्रातून ११ केंद्रीय कॅबिनेट यिन पदाधिकाऱ्यांची निवड झालेली होती. यिनच्या केंद्रीय कॅबिनेट समितीच्या अध्यक्षा दिव्या भोसले, मुख्य समिती कार्याध्यक्ष अनिकेत बनसोडे, रोजगार समितीचे अध्यक्ष निलेश चव्हाणके, राजकीय समितीचे अध्यक्ष परमेश्वर इंगोले, कार्याध्यक्ष अजय खांडबहाले, प्रवक्ते सत्यजित कदम, संघटक सत्यम धुमाळ, उद्योजक समितीचे उपाध्यक्ष प्रसाद सातपुते, प्रवक्ते प्रज्वल ढाणे, स्री प्रतिष्ठा समिती संघटक सायली वाडदेकर या सर्वांना घेऊन अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी गेलेले यिनचे महा. मुख्य अधिकारी अनिकेत मोरे या सर्वांच्या उपस्थितीत हा अभ्यास दौरा पूर्ण झाला.

यावेळी सकाळ माध्यम समूहाच्या संचालिका मृणाल पवार यांनी या पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधत शाल व डायरी देऊन त्या सर्वांचा सन्मान केला. यावेळी सकाळचे संपादक तथा यीनचे प्रमुख संदीप काळे, यीनचे व्यवस्थापक श्यामसुंदर माडेवार, आकाश पांढरे, शंतनू पोंगसे, अनुजा पाटील यांची उपस्थिती होती. मृणाल पवार यांनी सर्व टीम सोबत आभ्यास पूर्ण संवाद साधला.

यीन तरुणाईच्या सर्वांगिण विकासाचे व्यासपीठ : मृणाल पवार

यीनच्या माध्यामतून तरुणाईचा सर्वांगिण विकास होत आहे. आज राज्यातल्या सर्व कॉलेजमध्ये जाऊन युवकांचा विकास घडवून आणण्यात यीनचा महत्वपूर्ण वाटा आहे. यीन आता इतर राज्यात काम करू पाहते, त्यांना तिकडेही यश येते, ही आनंदाची बाब आहे. जम्मू काश्मीर सारख्या राज्यात रोजगाराचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. हा प्रश्न यीनच्या केंद्रीय मंत्रीमंडळाने आभ्यासासाठी घेतला हे चांगले झाले. आम्ही तरुणाईच्या सर्वांगिण विकासाठी एकसंघ होऊन काम करत युवकांना पुढे आणत राहू असे उद्गार सकाळ माध्यम समूहाच्या संचालिका मृणाल पवार यांनी काढले.

तिथले प्रश्न रोजीरोटीचे आहेत: दिव्या भोसले

ज्या पद्धतीने काश्मीरला गंभीर प्रश्न आहे, म्हणून संबोधले जाते वास्तविक पाहता तसं नाहीये. त्यांचे बेसिक प्रश्न हे ‘रोजीरोटी’चे आहेत. त्या प्रश्नांसाठी कुठल्याही सरकारने आत्तापर्यंत काही केलं नाही हे वास्तव आहे. दहशतवाद, राजकारण यापेक्षाही कश्मीरच्या त्या प्रत्येक युवकाला, सर्वसामान्य माणसाला आपल्या कुटुंबाच्या रोजीरोटीची, स्वाभिमानाची अधिक जाणवली गरज आम्हाला अभ्यास करतांना जाणवली.

अभिमानाने सांगावेसे वाटते की, कश्मीरसारखा इतका सुंदर प्रदेश आमच्या देशाचा भाग आहे. या पाच दिवसांमध्ये आम्ही अनुभवलं त्यातून असं वाटलं की आपण आपल्या कुटुंबासाठी, माणसासाठी, आपल्या कश्मीरी बांधवांसाठी काहीतरी केलं पाहिजे. माझी टीम सुद्धा तेच मनसुबे बांधून परतली. आम्ही तिथला अहवाल तयार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार आहोत. असे मत या सत्कार सोहळा कार्यक्रमात यिनच्या केंद्रीय कॅबिनेट समितीच्या अध्यक्षा दिव्या भोसले यांनी व्यक्त केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AC Tips and Tricks : उन्हाळ्यात AC ऑन करण्याआधी 'या' गोष्टी करा; अन्यथा तुम्हालाही लाईट बिल जास्त येईल

Abhijit Bichukale EXCLUSIVE: कल्याण लोकसभा मतदारसंघच का? अभिजित बिचुकले यांचं उत्तर ऐकण्यासारखंय!

Anuj Thapar : अनुज थापरचा शवविच्छेदन अहवाल आला समोर, कुटुंबीयांनी केली सीबीआय चौकशीची मागणी, नेमकं कारण काय ?

Onion Export News Today: 550 रुपये प्रतिमॅट्रिक टन शुल्क! कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Crime News : लग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षीय मुलीला नेले पळवून, वैद्यकीय तपासणीनंतर कुटुंबाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT