AC Tips and Tricks : उन्हाळ्यात AC ऑन करण्याआधी 'या' गोष्टी करा; अन्यथा तुम्हालाही लाईट बिल जास्त येईल

Tips and Tricks For AC : पावसाळा आणि हिवाळ्यानंतर आता एसी सुरू केला असेल तर आधी त्याची सर्विसिंग करून घ्या. सर्विसिंग न केल्याने एसी निट चालत नाही. जरी तुम्हाला थंड हवा मिळाली तरी मग एसीमुळे तुमचं लाईट बिल मोठ्याप्रमाणात वाढतं.
AC Tips and Tricks
AC Tips and TricksSaam TV

कडक उन्हाळ्यात प्रत्येकाच्या घरी एसी लावला जातो. बाहेरच्या कडक उन्हामुळे घरामध्ये देखील घामाच्या धारा वाहू लागतात. त्यामुळे तुम्ही देखील घरी एसीची हवा खात असाल. उन्हाळा संपल्यानंतर पावसाळा आणि हिवाळ्यात आपण एसी शक्यतो वापरत नाही. त्यामुळे पुन्हा पुढल्या वर्षी उन्हाळ्यातच एसी सुरू करतो. मात्र असं केल्याने तुम्हाला भरमसाठ लाईटबिल येण्याची शक्यता आहे.

AC Tips and Tricks
Coconut Water in Summer : 'या' ५ पद्धतीने नारळ पाणी प्या आणि तंदुरुस्त राहा; शरिरातील उष्णता चुटकीसरशी होईल गायब

एसी बऱ्यात दिवसांपासून बंद असल्यावर त्यामध्ये काही ना काही बिघाड होतो. त्यामुळे तुम्हालाही एसीची हवा कमी लागणे, एसीमधून पाणी येणे, तासंतास एसी सुरु ठेवूनही गरम होणे अशा समस्या जाणवत असतील तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे.

एसीची सर्विसिंग करा

एसी ही अशी गोष्ट आहे जिला वारंवार नाही मात्र ६ ते ७ महिन्यांतून एकदा तरी सर्विसिंग लागतेच. त्यामुळे तुम्ही पावसाळा आणि हिवाळ्यानंतर आता एसी सुरू केला असेल तर आधी त्याची सर्विसिंग करून घ्या. सर्विसिंग न केल्याने एसी निट चालत नाही. जरी तुम्हाला थंड हवा मिळाली तरी मग एसीमुळे तुमचं लाईटबिल मोठ्याप्रमाणात वाढतं.

एसी गॅस तपासून घ्या

एसीच्या कुलींगच्या कामासाठी एसीमधील गॅस तपासणे देखील गरजेचे आहे. एसी वापरण्यास सुरुवात करण्याआधी तुम्ही देखील एसी गॅस चेक करून घ्या. एसीमध्ये योग्य प्रमाणात गॅस नसेल तर एसी खराब होऊ शकतो. तुम्हीही कितीही वेळ एसी सुरू ठेवला तरी रुम थंड होणार नाही. कारण, एसीमध्ये गॅस कमी असल्याने कंप्रेसरवर दबाव वाढतो.

अनेक व्यक्ती एसीची सर्विसिंग करून घेत नाहीत. मात्र तसे न केल्याने अनेकवेळा एसी जास्तप्रमाणात खराब होतो. धूळ जास्त साठत राहिल्यास एसीच्या हवेतून खराब वास देखील येऊ लागतो. एसी जास्त खराब झाल्यानंतर त्याच्या दुरुस्तीच्या कामाचे पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला की लाईट बिल वाढतं. तसेच कधी कधी यामध्ये बिघाड होऊन शॉर्टसर्कीट होण्याची देखील भीती असते.

AC Tips and Tricks
OnePlus Ace 3 झटपट होतो चार्ज; जाणून घ्या भारतात कधी होणार लॉन्च, काय असेल किमत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com