गोपाल मोटघरे
पुणे: आमच्या गॅंग सोबत फिरत का नाही? असं म्हणत गाव गुंडाच्या टोळक्यांनी एका अल्पवयीन तरुणाला बेदम मारहाण केली आहे. लाकडी दांडक्याने पीडित अल्पवयीन तरुणाला बेदम मारहाण करून त्याला गावगुंडाचे पाया पडण्यास भाग पाडण्यात आल आहे.
या सर्व प्रकारचा गाव गुंडांनी व्हिडीओ तयार केला असून तो व्हिडीओ सर्वसामान्य नागरिकापर्यंत दहशत पसरण्यासाठी समाज माध्यमावर वायरल केला आहे. पुण्यातील सहकार नगर पोलिस स्टेशन हद्दीतील बालाजीनगर परिसरामध्ये ही घटना घडली आहे.
या घटनेत एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने सल्या उर्फ सलमान, आदेश बिरामणे, सुफियान, आफान शेख, सौरभ भगत, सेडी उर्फ संदीप सेंडकर व इतर तीन-चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 25 मार्चला बालाजीनगरच्या काशिनाथ पाटील नगर येथे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली आहे.
हे देखील पहा-
पीडित मुलगा ता. 25 मार्च रोजी बालाजीनगर परिसरातून जात होता. त्या वेळी दुचाकीवरून त्या ठिकाणी आलेल्या गाव गुंडांनी पीडित मुलाला जबर मारहाण करून "यापूर्वी तू आमच्या गँग सोबत फिरायचा, आता तू आमच्या सोबत राहत नाही" म्हणून लाकडी दांडक्याने बदेम मारहाण करत, "सलमान तेरा बाप है" असं म्हणत आरोपीला पाया पडायला लावले. त्यानंतर पीडित मुलास आरडाओरड करत जबर मारहाण केली आणि परिसरात दहशत निर्माण केली आहे. पीडित मुलाला बेदम मारहाण करून त्याचा व्हिडियो सोशल मीडियावर वायरल केल्याप्रकरणी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.