Manasvi Choudhary
शरीराला हलकी अन् पौष्टिक अशी मुगाच्या डाळीची खिचडी आहे.
मुगाची खिचडी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
मुगाची खिचडी बनवण्यासाठी मुग डाळ, तांदूळ, हळद, लाल तिखट, गरम मसाला, जिरे, कोथिंबीर, मीठ, तूप हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम मूगडाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून १० ते १५ मिनिटे पाण्यात भिजत घाला.
गॅसवर कुकरमध्ये तेल किंवा तूपमध्ये जिरे, हळद, लाल मसाला आणि गरम मसाला मिक्स करा.
मिश्रणात भिजवलेले तांदूळ आणि डाळ मिक्स करा त्यात मीठ आणि पाणी घाला.
मुगाची खिचडी चांगली शिजवून घ्या नंतर त्यावर कोथिंबीर घाला.
अशाप्रकारे गरमागरम मुगाची खिचडी सर्व्हसाठी तयार आहे.