धक्कादायक! तुम्ही समोसा खात असाल.... पाहा व्हिडिओ प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

धक्कादायक! तुम्ही समोसा खात असाल.... पाहा व्हिडिओ

कल्याणच्या काटेमानिवली परिसरातील धक्कादायक घटना

प्रदीप भणगे

कल्याण : समोशाचे पीठ घामाने माखलेल्या मांडीवर ठेवून मळले जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. कल्याणच्या काटेमानिवली चौकातील शंकर हॉटेलमध्ये अशा प्रकारे समोसे तयार केले जात होते. हा व्हीडीओ समोर आल्यावर पुन्हा एकदा नागरीकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचे उघड झाले आहे.

पहा व्हिडिओ-

कल्याण पूर्व भागात राहणारे भूषण पवार हे मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी आहे. रविवारी त्यांच्या समितीची एक बैठक होती. या बैठकीसाठी भूषण यांनी काटमानिवली परिसरातील शंकर हॉटेलला समोशाची ऑर्डर दिली होती. समोसे घेण्यासाठी ते दुकानात गेले असता त्यांनी पाहिले की, दुकानातील दोन कर्मचारी त्याठिकाणी समोसे तयार करत होते.

समोसे तयार करण्यासाठी जे पीठ मिळले जात होते. ते चक्क घामाने माखलेल्या मांडीवर मळले जात होते. हा प्रकार पाहताच भूषण यांनी व्हिडिओ काढला आहे. या प्रकरणात प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी भूषण यांनी केली आहे. मात्र, ज्या प्रकारे पीठ मळल जात होते. नागरीकांच्या आरोग्याला धोका आहे. प्रशासनाने त्वरित या दुकानावर कारवाई करुन, अन्य दुकानांचीही तपासणी केली पाहिजे, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : पाण्याने खरंच ओळखता येतं का नकली पनीर? जाणून घ्या पद्धत

Pune Crime: पुणे हादरले! आयटी इंजिनिअरसोबत भयंकर घडलं, नवऱ्यासह ५ जणांवर गुन्हा

Garba Hairstyles: गरबा दांडियासाठी ट्राय करा 7 ट्रेंडी हेअरस्टाईल, ट्रेडिशनल लूकला येईल मॉडर्न टच

Maharashtra News Live Update : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी धुळ्यात विरोधकांचा मोर्चा

CNG car mileage: 1 किलो CNG मध्ये कार किती किलोमीटर्स धावते?

SCROLL FOR NEXT