Yerawada News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News : आधी केली दारू पार्टी, नंतर नशेत घेतला गळफास; अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्येने पुणे हादरलं

Yerawada News: पुण्यातील येरवडा भागात काही अल्पवयीन मुलीने दारू पार्टी केली, यानंतर एका मुलीने नशेत गळफास घेत आपलं जीवन संपवलं

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका अल्पवयीन मुलीने दारूच्या नशेत गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील येरवडा भागात काही अल्पवयीन मुलीने दारू पार्टी केली, यानंतर या मुलीने नशेत गळफास घेत आपलं जीवन संपवलं, अशी माहिती मिळत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माहितीनुसार, मयत तरुणी ११वी मध्ये असून ती येरवडा भागात राहते. सोमवारी सायंकाळी ती आणि तिच्या एका मैत्रिणीने आई भाजी आणण्यासाठी गेली असता घरात दारू पार्टी करायचे ठरवले आणि मद्यप्राशन केले.

दरम्यान, मयत तरुणीच्या मैत्रिणीने त्याच भागात राहणाऱ्या एका तरुणाला रात्री ८ वाजता बोलावले होते. तो तरुण घरी पोहचताच त्याला एक तरुणी ओढणी वापरून गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली. यानंतर त्यानेच तिच्या आईला बोलवून आणले. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झालेला होता.

तर मयत तरुणीची मैत्रीण बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. या मुलीला तोंडावर पाणी मारून उठवण्यात आलं. तेव्हा ती दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले. तिला देखील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी याप्रकरणी तपासणी केली असता या दोघींनी दारू पार्टी केल्याचे समोर आले आहे. दारू पार्टीनंतर त्यांनी उलट्या देखील केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या तरुणीने आत्महत्या का केली, हे अद्याप समजू शकलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT