Balasaheb Dodtale, Dhangar Reservation, dasara melava saamtv
मुंबई/पुणे

Dasara Melava In Chaundi : धनगर आरक्षणासाठी चौंडीत दसरा मेळावा : बाळासाहेब दोलताडे

धनगर समाजाच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी आम्हांला भेटण्याची वेळ द्यावी अशी विनंती यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोलताडे यांनी केली आहे.

Siddharth Latkar

- सुशील थोरात

Dhangar Reservation : धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रवर्गात समाविष्ट कराव यासाठी दसऱ्याला अहमदनगरच्या चौंडी येथे भव्य आरक्षण दसरा मेळाव्याचे (dasara melava in chaundi) आयोजन करण्यात येणार आहे. या मेळावा यशवंत सेना आयाेजित करणार असल्याची माहिती यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोलताडे (Balasaheb Dodtale) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

चोंडी येथे अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन दोलताले यांनी मेळाव्याची घोषणा केली. आरक्षण देण्याबाबत काम करत असलेल्या सरकारला जनशक्तीच्या माध्यमातून संदेश देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे असेही दोलताडेंनी नमूद केले.

धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करा व या मागणीसाठी यशवंत सेनेने अहमदनगरच्या चौंडी येथे आंदोलन केलं. 21 दिवसाच्या आंदोलनानंतर सरकारने प्रतिसाद देत 50 दिवसांचा वेळ घेतला. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून सरकारकडून आरक्षणाबाबत कसलीही हालचाल होत नसल्याचा आरोप यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोलताडे यांनी केला आहे.

मागील पंधरा दिवसापासून सरकार नेमकं काय करत आहे हे आम्हाला काहीच कळत नाही मात्र 50 दिवसाच्या अवधीत आम्हाला आरक्षण मिळावं हीच आमची अपेक्षा असल्याचे दोलताडे यांनी म्हटले आहे.

धनगर समाजाच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी आम्हाला भेटण्याची वेळ द्यावी अशी विनंती यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोलताले यांनी केली आहे. आदिवासींच्या काही आमदारांचे शिष्टमंडळ थेट राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या भेटीला गेलं राष्ट्रपतींनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे मात्र आम्ही पत्रव्यवहार करूनही आम्हाला वेळ मिळत नाही. राष्ट्रपतींनी आम्हालाही वेळ द्यायला हवा आहे असं दोलताडे यांनी म्हटलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer Paratha: घरच्या घरी बनवा ढाबा स्टाईल पनीर पराठा; नाश्त्याचा बेत होईल भारी

By-Election: बारामती-राहुरी पोटनिवडणुकीत 'मविआ'चा धर्म की राष्ट्रवादीला साथ? उद्धव ठाकरे काय करणार?

Pune : शक्तिवर्धक औषध घेणं जिवावर बेतलं ! धावता-धावता मानसिक संतुलन बिघडलं, पोलीस भरती दरम्यान घडला भयानक प्रकार

Maharashtra Live News Update : सोलापूरमध्ये अवकाळी पाऊस-गारपिटीचा कहर; 3 एकर पपईची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हतबल

Marathi Singer Death: प्रसिद्ध मराठमोळा गायक कालवश; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT