'तो लुटायलाच आला आहे' मनी हाईस्टच्या निमित्ताने यशोमती ठाकुर यांचा मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा Saam Tv News
मुंबई/पुणे

'तो लुटायलाच आला आहे' मनी हाईस्टच्या निमित्ताने यशोमती ठाकुर यांचा मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांनी मनी हाईस्ट या वेबसिरीजचा संदर्भ घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता निशाणा साधला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जगभरात मनी हाईस्ट या वेबसिरीजची चर्चा सुरु आहे. या सिरीजचा पाचवा सिजन ३ सप्टेंबरला रिलीज झाला होता. सोशल मीडियीवरही अनेकजण या वेबसिरीजबद्दल भरभरुन बोलत आहेत. अशातच राजकीय मंडळी कसे मागे राहतील? राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांनी मनी हाईस्ट या वेबसिरीजचा संदर्भ घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता निशाणा साधला आहे. (Yashomati Thakur indirectly targets Modi on the occasion of 'Money Heist)

हे देखील पहा -

यशोमती ठाकुर यांनी एक ट्विट करत मोदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात की, ''तो लुटायलाच आलेला आहे. मात्र त्याने जगासमोर स्वतःचं असं चित्र उभं केलंय जसं की तो मसीहाच आहे. मी राजकीय विषयांवर नाही तर #MoneyHeist बद्दल बोलतेय. गैरसमज झाल्यास योगायोग समजावा.'' असं ट्विट करत त्यांनी मनी हाईस्टमधील प्रोफेसर या पात्राची तुलना अप्रत्यक्षपणे मोदींशी केली आहे. मनी हाईस्टमधील प्रोफेसर हा बॅंक लुटणाऱ्या प्लॅनचा मास्टरमाईंड असतो त्यामुळे या ट्विटची जोरदार चर्चा सुरु आहे.

यापुर्वीही यशोमती ठाकुर यांनी मोदींवर आणि भाजपवर अनेकदा टीका केली आहे. देशातील बेरोजगारी, महागाई आणि सातत्याने गॅस,पेट्रोल, डिझेल या इंधनाची दरवाढ या विषयांवरुन केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. मात्र यावेळी त्यांनी मोदींचा उल्लेख न करता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

Gajkesari Rajyog: आज गुरु चंद्राच्या युतीने तयार होणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

SCROLL FOR NEXT