सोमवती अमावस्येनिमित्त जेजूरी गड सजला आहे. जेजूरीच्या गडावर भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळतेय. सर्वत्र भंडाऱ्याची उधळण आणि भक्तांच्या तोंडी 'जय मल्हार...' नावाचा जयघोष तसेच खंडेरायाचं डोळ्याचं पारण फेडणार रूप पाहायला मिळतय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अखंड महाराष्ट्राच कुलदैवत असलेले जेजूरी (Jejuri) आज सोमवती यात्रेनिमित्त सजली आहे. भंडऱ्याची उधळण करत खंडरायाची पालखी निघाली होती, या पालखीनिमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत.
सोमवती यात्रेनिमित्त जेजूरी गडावर खूप दिवसांपासून जय्यत तयारी सुरू होती. खंडेरायाचं अस सजलेल रुप पाहून डोळ्याचं पारण फिटेल यासाठी ही यात्रा पाहण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने येथे येत असतात. यावर्षी सुद्धा लाखो भाविकांची उपस्थित पाहायला मिळतेय. भंडाऱ्याची उधळण करत खंडरायाची पालखी कऱ्हा नदी पात्रात स्नानासाठी निघणार आहे. जेजूरी गडावर भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनही सज्ज झाले आहे. खंडरायाच्या स्नानासाठी कऱ्हा नदीवर आल्यानंतर भाविकांना पार्किंगची सुविधा, तसेच पिण्याचे पाणी आणि महाप्रसादाची नियोजन करण्यात आले आहे. (Latest Marathi News)
सोमवती यात्रा आज 13 नोव्हेंबरला भरली असून जेजूरी गडावरून सकाळी 7 च्या सुमारास भंडाऱ्याची उधळण करत हा पालखी सोहळा सुरु झाला. तर खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या मूर्तीचं कर्हा नदीवर स्नान सोहळा हा दुपारी 12 ते 12.30 च्या सुमारास संपन्न होणार आहे. राज्यभरातून जेजुरी गडावर अनेक भाविकांनी गर्दी केली आहे. यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजनाही करण्यात आलेल्या आहेत. सोमवती यात्रेच्या नियोजनाबाबत काही दिवसांपूर्वी एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी खांदेकरांना विशिष्ट ड्रेसकोड देण्यात आला आहे. तसेच, पालखी सोहळ्यातील भाविकांना चहा, पाण्याची व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सोमवती यात्रेनिमित्त खंडेरायाच्या जेजुरीत वाहतुकीचे अनेक मोठे बदल करण्यात आलेले आहेत. पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून यासंदर्भात ट्वीट करत माहिती देली आहे. ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, "जेजुरीत श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त (दि. 13) वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. वाहन चालकांनी 13 नोव्हेंबर पहाटे पाच ते रात्री 10 वाजेपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करावा." असं आवाहन पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.
सासवड पोलीस ठाणे हद्दीतील वाहतुक बदल
पुणे बाजुकडून जेजुरी मार्गे फलटण-माताटा बाजुकडे जाणा जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद केली जाणार आहे. संबंधित वाहतूक सासवड- नारायणपुर- कापूरहोळ मार्गे सातारा-फलटण किंवा सासवड- वीर फाटा-परींचे वीर वाठार मार्गे लोणंद मागे वळविण्यात येणार आहे.
बारामती व निरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजूकडे जाणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. संबंधित वाहने मोरगाव-सुपा- केडगाव चौफुला मार्गे सोलापुर महामार्गवरून पुणे मार्गे वळविण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.