Yakub Memon Grave Politics Saam TV
मुंबई/पुणे

Yakub Memon Grave : दहशतवाद्याच्या कबरीवरुन राजकारण तापलं; भाजप-कॉंग्रेसचे एकमेकांवर गंभीर आरोप

Yakub Memon Grave Politics: याकूबला 2015 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई: १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दशहतवादी (Terroist) याकूब मेमन याच्या कबरीवरुन आता राज्यात राजकारण (Politics) सुरू झालं आहे. याकूबची कबर ही सजवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याकूबच्या कबरीला मार्बल्स टाईल्स लावले गेले आहेत, तसेच एलईडी दिव्यांनी कबरील सजवण्यात आले आहे. एवढंच नाही तर कबरीच्या सुरक्षेसाठी २४ तास पाहाराही ठेवण्यात आला असल्याचंही समोर आलं. हे प्रकरण समोर आल्यानंतर भाजपने रान उठवत महाविकास आघाडीवर आरोप केले आहेत. याला प्रत्तुत्तर म्हणून कॉंग्रेसनंही आपली बाजू मांडत भाजपवरच आरोप केले आहेत. (Yakub Memon Grave Politics)

भाजपचे आरोप -

याकूब मेमन याची कबर सजवण्याच्या मुद्द्यावरुन भाजप आमदार राम कदम यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर अनेक आरोप केले आहेत. राम कदम म्हणाले, "ही कबर कोणा पीरबाबाची नसून मुंबईतील ९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनची आहे. गुन्हेगाराच्या कबरीला पांढऱ्या संगमरवरी मझार बनवण्यात आले आहे. त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे की, 93 बॉम्बस्फोटातील गुन्हेगाराच्या कबरीची अशी सजावट का? असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

बावनकुळेही बरसले

याकूब मेमनच्या कबरीबाबत भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देशद्रोही याकूब मेमन यांच्या कबरीवर कोरोना काळात सौंदर्यीकरणं झाले. उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वेळ नव्हता, अशावेळी याकूब मेमन याच्या कबरीला अलिखित परवागनगी दिली असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व त्यांनी सरकारसाठी किती ऍडजस्ट केले हे यातुन स्पष्ट होते अशी बोचरी टीका बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. पुढे ते म्हणाले की, आम्ही याचा निषेध करत आहोत. ज्यांनी हा देशद्रोही गुन्हा केला त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मी मागणी करत आहे. भाजप सरकारला विनंती करत आहे की, सरकारने तातडीने मविआने याला समर्थन केले ते आणि ज्याने सुशोभिकरणं केले त्यांना तातडीने शोधून काढावे. हे गंभीर प्रकरण आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व सोडणार नाही. मग हे कुणी केलं? ही घटना उद्धव ठाकरे यांच्या काळात घडली त्यामुळे यात दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई व्हावी अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.

कॉंग्रेसचं प्रत्युत्तर

याकूब मेमनची कबर सजवण्याच्या आरोपावर कॉंग्रेसनंही प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे की, सर्वात मोठी चूक भाजपची आहे. यूपीए सरकारच्या काळात दोन कुख्यात दहशतवाद्यांना फाशी देण्यात आली. एक अफजल गुरू आणि दुसरा कसाब. मात्र सरकारने दोघांचेही मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवले नाहीत. याचं कारण म्हणजे या लोकांच्या कबरी, ज्या ठिकाणी हे लोक दफन केले जातात, ती जागा कोणाला तरी रेलिंग पॉइंट बांधण्याची संधी देते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंत्यसंस्कार झाले. इतके लोक का सामील झाले? भाजपने राजकीय फायद्यासाठी हे केले. याकुब मेमनच्या कबरीचा गौरव आज होत आहे. याला भाजप थेट जबाबदार आहे, असं अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे.

कोण आहे याकुब मेमन?

याकूब मेमन हा मुंबईतील ९३ बॉम्बस्फोटांचा दोषी आहे. ज्याला 2015 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर 30 जुलै 2015 रोजी दक्षिण मुंबईतील बडा स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याकूब हा एकमेव दोषी होता ज्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता त्याच याकुबच्या कबरीचे समाधीत रूपांतर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संगमरवरी दगडापासून बनवलेल्या या कबरीवर एलईडी दिवे लावण्यात आले होते. तसेच इथे 24 तास पहारा असतो.

सामच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग

दरम्यान, याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभिकरणाची साम टीव्हीने बातमी दिल्यानंतर, प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पालिकेने या कबरीवरील एलईडी दिवे हटवले असून पोलिसांकडूनही याबाबत कारवाई करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fighting Viral Video: कारमध्ये बसवून धू धू धुतलं, आधी मुलीनं मारलं; नंतर मित्रानेच ९० सेकंदात २६ वेळा तरुणाच्या कानशिलात लगावल्या| पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: मथुरेत पावसाचा हाहाकार, यमुना नदीचे पाणी घरात शिरलं

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले; १० तोळ्यामागे ८,७०० रुपयांनी वाढ, वाचा आजचे भाव

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT