Buldhana Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: गोणीत आढळला तरुणीचा हात-पाय तोडलेला मृतदेह; धक्कादायक घटनेनं मुंबई हादरली

Crime News: हात पाय तुटलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह सापडलाय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Ruchika Jadhav

सचिन गाड

Worli Sea Face Crime News: मुंबईतून काळजाचा थरकाप उडवणारी एक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या वरळी सी फेसवर (Worli Sea Face) गोणीत एका तरुणीचा मृतदेह आढळला आहे. हात-पाय तुटलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह सापडलाय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. तरुणीचं वय १८-२० वर्षांच्या दरम्यान असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. वरळी पोलिसांनी अज्ञाता विरुध्द हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळी कोळीवाडा येथील आयएनएस राहताच्या पाठीमागे काल संध्याकाळी एका गोणीत व्यक्तीचे पाय दिसत असून उग्र वास येत होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाहिले असता गोणीत एका महिलेचा मृतदेह दिसला.

या आधी श्रद्धा वालकर, नंतर सरस्वती आणि आता आणखीन एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आधीच्या दोन्ही हत्या या प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून झाल्याचं समजलं होतं. यासह मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये देखील महिला सुरक्षित नसल्याचं दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सातत्याने घडत असलेल्या या घटनांमुळे मुंबईत तरुणी-महिला खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली, थंडीचा कडाका जाणवणार; पंखे, कुलर, एसी बंद

Maharashtra Politics : भाजपला का हवेत फडणवीसच? संघही अनुकूल, आमदारांचाही पाठिंबा

Mumbai Crime : केमिकलचे स्प्रे मारून कुत्र्याचा डोळा केला निकामी; भांडुपमधील महिलेचं घृणास्पद कृत्य, पोलिसांत गुन्हा

Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

Maharashtra Politics: EVM विरोधात लढण्याचा पवारांचा निर्धार! आंदोलन उभारण्याचा ठाकरेंचा इशारा

SCROLL FOR NEXT