Worli Bandra C Link Saam TV
मुंबई/पुणे

Worli Bandra C Link : वरळी-वांद्रे सी लिंकवरील टोलच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर

Ruchika Jadhav

Worli Bandra C Link :

मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोलच्या दराच वाढ झाली आहे. येत्या १ एप्रिलपासून वाढीव दर लागू होणर असल्याची माहिती समोर आलीये. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी याबाबत घोषणा केलीये.

वांद्रे वरळी सी लिंकवरील नवीन टोल दर किती?

MSRDC कडून मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिलपासून टोलच्या दरात १८ टक्क्यांनी वाढ होणार आहे. म्हणजेच कार आणि जीपने प्रवास करताना आतापर्यंत ८५ रुपये भरावे लागत होते. त्यांना आता टोलचे जास्तीचे १०० रुपये मोजावे लागणार आहेत.

मिनीबस,टेम्पो तसेच तत्सम वाहनांना १३० रुपये टोल आकारला जात होता. त्यांना आता १६० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. सुधारित टोल दर १ एप्रिल २०२४ पासून ३१ मार्च २०२७ पर्यंत लागू असतील.

वांद्रे-वरळी सी लिंकवरून दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना एक दिलासादायक बाब म्हणजे प्रवासी एकाचवेळी ५० टोल कूपन घेऊ शकतात. एकाचवेळी ५० कूपन घेतल्यास १० टक्क्यांची सूट मिळणार आहे.

याचप्रमाणे जर एकाचवेळी १०० कूपन खरेदी केले तर टोलच्या एकूण रकमेवर २० टक्क्यांचा दिलासा मिळणार आहे. एमएसआरडीसीने याबाबतची माहिती स्पष्ट केली आहे. महिनाभर सतत येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मासिक पासची उपलब्ध आहे. मासिक पासमध्ये देखील मोठी सवलत मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT