२८ सप्टेंबरला संपूर्ण जगभरात 'जागतिक रेबिज दिन' साजरा करण्यात आला. कुत्र्यांपासून होणाऱ्या या आजारामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे जगात रेबिज आजाराविषयी जनजागृती व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
येत्या काही वर्षात मुंबईला रेबिजमुक्त करण्यासाठी एक उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत महानगरपालिका आणि 15 स्वयंसेवी संस्थांच्या वतीने 15 हजार भटक्या कुत्र्यांचे रेबिज लसीकरण करण्यात येणार आहे.
लसीकरण झालेल्या कुत्र्यांच्या गळ्यात 'क्यू आर कोड' असलेले कॉलर घालण्यात येणार आहे. हे क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर त्या कुत्र्यांची सर्व माहिती मोबाईल अॅपवर उपलब्ध होणार आहे. हे संपूर्ण लसीकरण अॅपवर आधारित आहे. मुंबईत पहिल्यांदाच अॅपच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येणार आहे.
28 सप्टेंबर 2023 म्हणजेच जागतिक रेबिज दिनाच्या दिवसाचा मुहूर्त साधून हे लसीकरण सुरु केले आहे. 29 सप्टेंबर 2023 ते 10 ऑक्टोबर 2023 या 10 दिवसात मुंबईतील काही भागांमध्ये 15 हजार कुत्र्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी शंभर कर्मचारी काम करणार आहेत.
2014 च्या सर्वेक्षणानुसार, 95 हजार भटके कुत्रे होते. त्यांची संख्या आता सुमारे 1 लाख 64 हजारांवर पोहोचल्याचा अंदाज आहे. या भटक्या कुत्र्यांना रेबिजची लागण होऊ नये. त्यांच्यामुळे नागरिकांना काही त्रास होऊ नये. त्यासाठी ही लस देणे महत्त्वाचे आहे. 2014 नंतर 2024 मध्ये दहा वर्षांनी कुत्र्यांची जणगणना पुन्हा होणार आहे.
विशेष म्हणजे, या उपक्रमाअंतर्गत भटक्या कुत्र्यांची सर्व माहिती जमा केली जाणार आहे. त्यांना सव्यंसेवी संस्थांच्या मदतीने लसीकरण करण्यात येणार आहे. ही माहिती मोबाईल अॅपमध्ये उपलब्ध होणार आहे. असे आरोग्य खात्याचे तथा देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली आहे. या लसीकरणासाठी काही संस्था मोफत लसींचा पुरवठा करणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.