कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ इंदापूरात कामबंद आंदोलन 
मुंबई/पुणे

कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ इंदापूरात कामबंद आंदोलन

ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या कर्तव्य बजावत असताना एका फेरीवाल्याकडून त्यांच्यावर हल्ला झाला होता. यात त्यांची दोन बोटं कापली गेली.

मंगेश कचरे

बारामती : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या कर्तव्य बजावत असताना एका फेरीवाल्याकडून त्यांच्यावर हल्ला झाला होता. यात त्या जखमी होऊन त्यांची दोन बोटं कापली गेली. या कृत्याचा निषेध म्हणून पुणे जिल्ह्यातील इंदापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आज दिवसभर कामबंद आंदोलन करून या घटनेचा निषेध नोंदवला आहे. (Work stoppage agitation in Indapur to protest the attack on Kalpita Pimple)

हे देखील पहा -

यावेळी कामगार एकजुटीचा विजय असो, हल्ल्याचा निषेध असो अशा घोषणाही देण्यात आल्या. एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक असून त्यासाठी निषेध म्हणून एक दिवस काम बंद आंदोलन केले असल्याचे प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षीरसागर यांनी सांगितले. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकार्‍यांवर हल्ले करतात तेव्हा अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्चीकरण होते.

त्यामुळे अशा हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावरील उपाय आहे, असे हल्ले आम्ही खपवून घेणार नाही अशी प्रतिक्रिया नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मोहन शिंदे यांनी दिली आहे. यावेळी अनेक कर्मचारी उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

Thane : ५६९ जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप, मनसैनिकाची शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ठाण्याचा शिवसैनिक खवळला

SCROLL FOR NEXT