Metro Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Metro Line 3: कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गाचे काम जलद गतीने होणार; मेट्रोकडून अनुभवी व्यक्तींची संचालकपदी नियुक्ती

Mumbai Metro Line 3: मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गाच्या कामाकडे अनेक मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे.

Vishal Gangurde

Mumbai News: मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गाच्या कामाकडे अनेक मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे. या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गाचं काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन पूर्ण करत आहे. या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने आर. रमणा यांची संचालक (नियोजन आणि रिअल इस्टेट डेव./NFBR) तर राजीव यांची संचालक (प्रणाली आणि संचलन व देखभाल) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

शहर नियोजन, वाहतूक व परिवहन, वाहतूक आणि प्रादेशिक नियोजन, वित्त, पायाभूत सुविधांची अंमलबजावणी आणि शहरी महामार्ग अशा विविध प्रकल्पांच्या कामाचा रमणा यांना तीन दशकांहून अधिक काळाचा दांडगा अनुभव आहे.

मुं.मे.रे.कॉ.मध्ये साधारण ९ वर्ष रमणा हे कार्यकारी संचालक (नियोजन) पदी कार्यरत होते. या दरम्यान त्यांनी मुंबई मेट्रो-३ मार्गाची अंमलबजावणी, भूसंपादन, पुनर्वसन, पर्यावरण आणि इंटरमॉडल एकत्रीकरण (Intermodal Integration) संबंधित कामे हाताळली.

याशिवाय मुंबई मेट्रो मास्टर प्लॅनिंग, डीपीआर आणि मुंबई २ व ३ च्या विशिष्ट मार्गाच्या अंमलबजावणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच त्यांनी उच्च न्यायालयात समिती सदस्य म्हणूनही जबाबदारी पार पाडली. अनेक सार्वजनिक सल्ला प्रक्रियांमध्ये त्यांनी सहभाग दर्शवला असून आयआयटी बॉम्बे येथे बाह्य परीक्षक म्हणूनदेखील काम पाहिले.

राजीव यांनी १९९५ साली भारतीय रेल्वेमधून आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली. या २० वर्षाच्या कालावधीत त्यांनी महत्वाच्या विविध पदांवर कार्यभार सांभाळला. त्यांना रेल्वे आणि मेट्रो रेल्वे प्रणालीतील रोलिंग स्टॉक, ओव्हरहेड ट्रॅक्शन, वीज पुरवठा तसेच इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल (E & M) संबंधीत जवळपास तीन दशकांच्या कामाचा अनुभव आहे.

राजीव यांनी त्यांच्या कार्यकाळात मध्य रेल्वेत उपमुख्य दक्षता अधिकारी (विद्युत) पदावर ५ वर्ष कार्यभार सांभाळला. त्यानंतर मार्च २०१६ साली ते मुं.मे.रे.कॉ.मध्ये महाव्यवस्थापक (रोलिंग स्टॉक) पदी रुजू झाले. पुढे त्यांनी कार्यकारी संचालक (रोलिंग स्टॉक) म्हणून पदभार स्वीकारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

Maharashtra Politics : शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची भेट;महापालिकेची रणनिती ठरली? VIDEO

Astrology: 'या'५ राशींवर होणार धनवर्षाव, द्विद्वाद योगामुळे होतील मोठे फायदे

SCROLL FOR NEXT